मुक्तपीठ टीम
कोल इंडियात ‘मॅनेजमेंट ट्रेनी’ पदांच्या मायनिंग या पदावर ६९९ जागा, सिव्हिल या पदावर १६० जागा, इलेक्ट्रॉनिक्स अॅंड टेलिकम्युनिकेशन या पदासाठी १२४ जागा, सिस्टम अॅंड ईडीपी या पदासाठी ६७ जागा अशा एकूण १ हजार ५० जागांवर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २२ जुलै २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, मायनिंग/ सिव्हिल/ इलेक्ट्रॉनिक्स अॅंड टेलिकम्युनिकेशन/ कॉम्प्युटर सायन्स/ कॉम्प्युटर/ आयटी इंजिनिअरिंग या क्षेत्रात ६०% गुणांसह बीई/ बी.टेक/ बी.एससी इंजिनीअरिंग केलेले असावे किंवा ६०% गुणांसह एमसीए २) गेट २०२२ उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ३० वर्षांर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून १ हजार १८० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी/ ईएक्सएसएम उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी कोल इंडियाच्या अधिकृत वेबसाइट https://www.coalindia.in/ वरून माहिती मिळवू शकता.