मुक्तपीठ टीम
कोल इंडियात ‘मॅनेजमेंट ट्रेनी’ पदांवर पर्सनल अॅंड एचआर पदासाठी १३८ जागा, एनव्हार्यमेंट या पदासाठी ६८ जागा, मटेरियल्स मॅनेजमेंट या पदासाठी ११५ जागा, मार्केटिंग अॅंड सेल्स या पदासाठी १७ जागा, कम्युनिटी डेव्हलपमेंट या पदासाठी ७९ जागा, लीगल या पदासाठी ५४ जागा, पब्लिक रिलेशन्स या पदासाठी ०६ जागा, कंपनी सेक्रेटरी या पदासाठी ०४ जागा अशा एकूण ४८१ जागांवर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ०७ ऑगस्ट २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे. या बातमीविषयी अधिक माहितीसाठी व्हिडीओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली संबंधित बातमीची लिंक क्लिक करा आणि मुक्तपीठच्या वेबसाइटला भेट द्या.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, ६०% गुणांसह पर्यावरण/ इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल इंजिनीअरिंग पदवी/ पदवीधर किंवा ६०% गुणांसह एलएलबी/ एमबीए/ पीजी पदवीधारक असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ३० वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस उमेदवारांनी १ हजार १८० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी/ ईएक्सएसएम उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी कोल इंडियाच्या अधिकृत वेबसाइट https://www.coalindia.in/ वरून माहिती मिळवू शकता.