मुक्तपीठ टीम
सर्वोच्च न्यायालयात कनिष्ठ न्यायालय सहाय्यक पदावर एकूण २१० जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १० जुलै २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. कनिष्ठ न्यायालय सहाय्यक पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही क्षेत्रात बॅचलर पदवी पूर्ण केलेली असावी, इंग्रजी संगणक टायपिंग, संगणक ऑपरेशनचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते ३० वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल, ओबीसी, ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून ५०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी, एसटी उमेदवारांकडून २५० रूपये शुल्क आकारले जाणार आहे.
अर्ज करताना आवश्यक सूचना
- कनिष्ठ न्यायालय सहाय्यक भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत अधिसूचना वाचणे आवश्यक आहे.
- फॉर्ममध्ये तुमचा मूळ तपशील भरा आणि तुमचा फोटो, सही, ओळखपत्र आणि इतर कागदपत्रे अपलोड करा.
- अर्ज सबमिट करण्यापूर्वी, फॉर्ममध्ये भरलेले तपशील पुन्हा एकदा तपासा.
- भविष्यातील संदर्भासाठी फॉर्मची प्रिंट आउट घ्या.