मुक्तपीठ टीम
मुंबई मनपाच्या अंतर्गत आरोग्य सेवेसाठी सल्लागार, बालरोग तज्ञ, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक, मानसोपचार तज्ज्ञ पदाच्या एकूण १० रिक्त जागा आहेत. त्या भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. या पदासाठी निवड झाल्यास ७५ हजारापर्यंत पगार दिला जाणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार ६ मे २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठातून एमबीबीएस/एमडी/एमबीए/एमपीएच पर्यंतचे शिक्षण पूर्ण असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित पदांचा किमान पाच वर्षांचा अनुभव असावा.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ४५ वर्षापेक्षा अधिक नसावे.
अधिक माहितीसाठी मुंबई मनपाच्या अधिकृत वेबसाइट https://portal.mcgm.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.