मुक्तपीठ टीम
भारतीय लष्करात अकॅडेमीत ‘ग्रुप सी’ पदांच्या कुक स्पेशल, कुक आयटी, एमटी ड्राइव्हर, बूट मेकर/ रिपेयर, निम्न श्रेणी लिपिक, मसालची, वेटर, फातिगमन, सफाईवाला, ग्राउंड्समन, जीसी ऑर्डली, चौकीदार या आणि अशा आणखी पदांसाठी एकूण १८८ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ०३ जानेवारी २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- पद क्र.१- १) १०वी उत्तीर्ण २) भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान
- पद क्र.२- १) १०वी उत्तीर्ण २) भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान
- पद क्र.३- १) १०वी उत्तीर्ण २) अवजड वाहनचालक परवाना ३) २ वर्षे अनुभव
- पद क्र.४- १) १०वी उत्तीर्ण २) सर्व कॅनव्हास, कापड आणि लेदर दुरुस्ती आणि उपकरणे आणि बूट बदलण्यास सक्षम असावे.
- पद क्र.५- १) १२वी उत्तीर्ण २) संगणकावर इंग्रजी टाइपिंग ३५ श.प्र.मि. किंवा संगणकावर हिंदी टायपिंग ३० श.प्र.मि.
- पद क्र.६- १) १०वी उत्तीर्ण २) मसालचीच्या कर्तव्याची माहिती असणे आवश्यक आहे.
- पद क्र.७, ९, ११,१२ साठी उमेदवार १०वी उत्तीर्ण
- पद क्र.८- १) १०वी उत्तीर्ण २) फातिगमनच्या कर्तव्याची माहिती असणे आवश्यक आहे. तसेच अशी आणखीही पदं आहेत.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते २७ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या जनरल वर्गातील उमेदवारांकडून ५० रूपये आकारले जाणार तर, इतर वर्गातील उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अर्ज कसा करावा
अर्ज नोंदणीकृत पोस्ट/ स्पीड पोस्टद्वारे (केवळ भारतीय पोस्टल सेवेद्वारे) स्वीकारले जातील. दोन स्व-पत्त्याचे लिफाफे (आकार ९″X ४″) त्यावर ५ रुपये १- स्टॅम्प चिकटवा. कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे योग्यरित्या टॅग करणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी आयसीटीच्या अधिकृत वेबसाइट https://www.indianarmy.nic.in/ वरून माहिती मिळवू शकता.