मुक्तपीठ टीम
नागपूर महानगरपालिकेत अग्निशामक या पदावर एकूण १०० जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २६ मार्च २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. ही भरती नागपूर शहरात होणार आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- १०वी उत्तीर्ण
- राज्य अग्निशामक केंद्र, मुंबई पाठ्यक्रम उत्तीर्ण किंवा महाराष्ट्र राज्य तांत्रिक शिक्षण महामंडळ/ अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था यांचेकडील कोर्स उत्तीर्ण
- एमएस-सीआयटी असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते ३० वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकडून ३०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, मागासवर्गीय उमेदवारांकडून १५० रूपये शुल्क आकारले जाणार आहे.
शारीरिक पात्रता
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शारीरिक पात्रती ही पुढीलप्रमाणे असावी,
- पुरूष- उंची १६५ से.मी., छाती ८१ ते ८६ से.मी., वजन जास्तीत जास्त ५० किलो
- महिला- उंची १६२ से.मी., वजन जास्तीत जास्त ५० किलो
अधिक माहितीसाठी नागपूर महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइट https://www.nmcnagpur.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.