मुक्तपीठ टीम
ओएनजीसीत फायनान्स अॅंड अकाउंट्स ऑफिसर या पदासाठी ४८ जागा, सेक्रेटेरियल एक्झिक्युटिव्ह या पदासाठी ०४ जागा, मरीन ऑफिसर या पदावर ०४ जागा अशा एकूण ५६ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ०७ नोव्हेंबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आणि परदेश आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- पद क्र.१- पदवीधर + आयसीडब्ल्यूए/ सीए किंवा फायनान्स एमबीए/ ६०% गुणांसह पीजीडीएम/ एमबीए
- पद क्र.२- १) इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाची अंतिम परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी आणि इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाचे सहयोगी/ फेलो सदस्य असावेत. २) ०२ वर्षे अनुभव
- पद क्र.३- १) परिवहन मंत्रालयाचे मास्टर फॉरेन गोइंगच्या योग्यतेचे प्रमाणपत्र २) ०३ वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ३० वर्षांपर्यंत वय असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून ३०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी ओएनजीसीच्या अधिकृत वेबसाइट https://www.ongcindia.com/ वरून माहिती मिळवू शकता.
नोकरीची लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/1258/75116/Instruction.html#nogo
अधिकृत जाहिरात
https://drive.google.com/file/d/1DRDuH4txFU5a0sysrcx1KWTDFkmdD4VS/view








Subscribe