मुक्तपीठ टीम
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये इंजिनीअर/ अधिकारी पदासाठी केमिकल इंजिनीअरिंग, सिव्हील इंजिनीअरिंग, कॉम्प्युटर एससी अँड इंजिनीअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग, इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनीअरिंग, मेकॅनिकल इंजिनीअरिंग, मेटॅलर्जिकल इंजिनीअरिंग या विषयांमध्ये इंजिनीअरिंग पदवी असणाऱ्यांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २२ मे २०२२ पर्यंत अर्ज करू शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- इंजिनीअरिंग पदवीधर गेट परीक्षा २०२२ उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- यासह, उमेदवारांनी पदवी स्तरावर किमान ६५ % गुण प्राप्त केलेले असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २६ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून नियमानुसार शुल्क आकारले जाणार आहे.
भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया
- इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अधिकृत संकेतस्थळ iocl.com वर जा.
- होमपेजवर ‘What’s New’ पर्यायावर क्लिक करा.
- अर्जाच्या लिंकवर क्लिक करा.
- अर्ज भरा आणि सबमिट करा.
- भविष्यातील वापरासाठी फॉर्मची प्रिंटआउट घ्या.
अधिक माहितीसाठी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट iocl.com वरून माहिती मिळवू शकता.