मुक्तपीठ टीम
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने अभियांत्रिकी सहाय्यक आणि तंत्रज्ञ यासह विविध पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. एकूण २१ जागांवर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २३ सप्टेंबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- अभियांत्रिकी सहाय्यक (प्रशिक्षणार्थी): मान्यताप्राप्त संस्थेतून ३ वर्षांचा अभियांत्रिकी पदविका.
- तंत्रज्ञ: SSLC+ITI+एक वर्ष शिकाऊ उमेदवारी (किंवा) SSLC+३ वर्षे नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट कोर्स.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २८ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या जनरल/OBC/EWS श्रेणीतील उमेदवारांकडून २९५ रूपये शुल्क आकारले जाणार तर, SC/ST/PWBD/माजी सैनिक शिपाई उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
असा करा अर्ज
अधिक माहितीसाठी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट www.bel-india.in वरून माहिती मिळवू शकता.
https://bel-india.in/Documentviews.aspx?fileName=English%20Detailed%20Advertisement-1-09-22.pdf