मुक्तपीठ टीम
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत ‘ब्रिडींग चेकर’ या पदावर एकूण २५ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २४ डिसेंबर २०२२ पर्यंत मुलाखत देऊ शकतात. नोकरीचे ठिकाण पुण्यातील थेरगाव रुग्णालय आहे. ही भरती मुलाखत स्वरूपात होणार आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, १०वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते ४३ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइट https://www.pcmcindia.gov.in/marathi/ वरून माहिती मिळवू शकता.
अधिकृत जाहिरात
https://drive.google.com/file/d/1eldZ5Paz_LmykqZldXpfZmCttTnCTKLA/view








Subscribe