मुक्तपीठ टीम
भारतीय लष्कराच्या एएससी सेंटरमध्ये सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर, क्लिनर, कुक, सिव्हिलियन कॅटरिंग इन्स्ट्रक्टर, लेबर, एमटीएस (सफाईवाला) या पदांवर एकूण ४०० जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १७ सप्टेंबर २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, १) पद क्र.१- १) १०वी उत्तीर्ण २) अवजड आणि हलके वाहन चालक परवाना ३) २वर्षे अनुभव
२) पद क्र.२- १०वी उत्तीर्ण
३) पद क्र.३- १) १०वी उत्तीर्ण २) १ वर्ष अनुभव
४) पद क्र.४- १) १०वी उत्तीर्ण २) कॅटरिंग प्रमाणपत्र किंवा डिप्लोमा
५) पद क्र.५- १०वी उत्तीर्ण
६) पद क्र.६- १०वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते २७ वर्ष असावे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
१. पद क्र .१ ते ४ साठी प्रीसायडिंग ऑफिसर, सिव्हिलियन डायरेक्ट रिक्रूटमेंट बोर्ड, सीएचक्यू, एएससी सेंटर (उत्तर)-१ एटीसी, आग्रम पोस्ट, बंगळुरू-०७
२. पद क्र .५ आणि ६ साठी प्रीसायडिंग ऑफिसर, सिव्हिलियन डायरेक्ट रिक्रूटमेंट बोर्ड, सीएचक्यू, एएससी सेंटर (दक्षिण)-२ एटीसी, आग्रम पोस्ट, बंगलोर-०७
अधिक माहितीसाठी
भारतीय लष्कराच्या अधिकृत वेबसाइट https://indianarmy.nic.in/home वरून माहिती मिळवू शकता.