मुक्तपीठ टीम
भारतीय स्टेट बँकेत असिस्टंट मॅनेजर (मार्केटिंग अॅंड कम्युनिकेशन) एडव्हायझर, असिस्टंट मॅनेजर- इंजिनीअर (सिव्हिल), असिस्टंट मॅनेजर- इंजिनीअर (इलेक्ट्रिकल), डेप्युटी मॅनेजर, रिलेशनशिप मॅनेजर, प्रोडक्ट मॅनेजर या पदांसाठी एकूण ६८ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २ सप्टेंबर २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, १) पद क्र.१- १) एमबीए (मार्केटिंग)/ पीजीडीएम २) ३ वर्षे अनुभव
२) पद क्र.२- १) ६०% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी २) २ वर्षे अनुभव
३) पद क्र.३- १) ६०% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी २) २ वर्षे अनुभव
४) पद क्र.४- १) एमबीए/ पीजीडीएम (ग्रामीण व्यवस्थापन /कृषी व्यवसाय) किंवा पीजी डिप्लोमा (ग्रामीण व्यवस्थापन) किंवा कृषी पदव्युत्तर पदवी २) ३ वर्षे अनुभव
५) पद क्र.५- १) बी.ई/ बी.टेक २) एमबीए/ पीजीडीएम ३) ५ वर्षे अनुभव
६) पद क्र.६- १) बी.टेक/ बी.ई (कॉम्प्युटर सायन्स/ आयटी/इलेक्ट्रॉनिक्स अॅंड कम्युनिकेशन २) एमबीए/ पीजीडीएम ३) ५ वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ३५ वर्षांपर्यंत असावे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून ७५० रूपये शुल्क आकारले जाणार तर, इतर वर्गातील उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी एसबीआयच्या अधिकृत वेबसाइट https://sbi.co.in/ वरून माहिती मिळवू शकता.