मुक्तपीठ टीम
मिलट्री इंजिनीअरिंग सर्व्हिसमध्ये ड्राफ्ट्समन या पदासाठी ५२ जागा, सुपरवाइजर (बी/ एस) या पदासाठी ४५० जागा अशा एकूण ५०२ पदांवर भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १२ एप्रिल २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, १) पद क्र.१- आर्किटेक्चरल असिस्टंटशिप मध्ये डिप्लोमा
२) पद क्र.२- अर्थशास्त्र किंवा वाणिज्य किंवा आकडेवारी / व्यवसाय अभ्यास किंवा सार्वजनिक प्रशासन पदव्युत्तर पदवी + १ वर्ष अनुभव किंवा अर्थशास्त्र किंवा वाणिज्य किंवा आकडेवारी / व्यवसाय अभ्यास किंवा सार्वजनिक प्रशासनात पदवी + मटेरियल मॅनेजमेन्ट / वेअरहाउसिंग मॅनेजमेन्ट/ खरेदी / लॉजिस्टिक / सार्वजनिक खरेदी मध्ये डिप्लोमा+ २ वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते ३० वर्षापर्यंत असावे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून १०० रूपये शुल्क आकारले जाईल तर एससी, एसटी,पीडब्ल्यूडी, इएक्सएसएम आणि महिला उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी
मिलट्री इंजिनीअरिंग सर्व्हिसच्या अधिकृत वेबसाइट https://mes.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.