मुक्तपीठ टीम
बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये अधिकारी पदासाठी जनरलिस्ट ऑफिसर एमएमजीसी स्केल २ या पदासाठी ४०० जागा, जनरलिस्ट ऑफिसर एमएमजीसी स्केल ३ या पदासाठी १०० जागा अशा एकूण ५०० जागांवर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २२ फेब्रुवारी २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- पद क्र.१- १) ६०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी किंवा सीए/ सीएमए/ सीएफए २) ०३ वर्षे अनुभव
- पद क्र.२- १) ६०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी किंवा सीए/ सीएमए/ सीएफए २) ०५ वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
पद क्र.१ साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २५ ते ३५ तर, पद क्र.२ साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २५ ते ३८ वर्ष असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून १ हजार १८० रूपये शुल्क, एससी/ एसटी उमेदवारांकडून ११८ रूपये शुल्क आकारले जाणार तर, पीडब्ल्यूडी/ महिला उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी बँक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकृत वेबसाइट https://www.bankofmaharashtra.in/ वरून माहिती मिळवू शकता.