मुक्तपीठ टीम
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत अतिरिक्त कायदा सल्लागार, विधी अधिकारी, उप मुख्य अग्निशमन अधिकारी, विभागीय अग्निशमन अधिकारी, उद्यान अधिक्षक, सहाय्यक उद्यान अधिक्षक, उद्यान निरीक्षक, हॉर्टिकल्चर सुपरवायझर, कोर्ट लिपिक, ॲनिमल कीपर, समाजसेवक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, लिपिक, आरोग्य निरीक्षक, कनिष्ठ अभियंता, अशा एकूण ३८६ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ०८ सप्टेंबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण पिंपरी-चिंचवड आहे. या बातमीविषयी अधिक माहितीसाठी व्हिडीओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली संबंधित बातमीची लिंक क्लिक करा आणि मुक्तपीठच्या वेबसाइटला भेट द्या.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, नियमांनुसार आणि पदांनुसार असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते ३८ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या खुल्या वर्गातील उमेदवारांकडून १ हजार रूपये शुल्क आकारले जाणार तर, मागासवर्गीय उमेदवारांकडून ८०० रूपये शुल्क आकारले जाणार आहे.
अधिक माहितीसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइट https://www.pcmcindia.gov.in/marathi/ वरून माहिती मिळवू शकता.
अर्ज करण्यासाठी नोकरीची लिंक
https://www.pcmcindia.gov.in/marathi/rec2022.php
जाहिरातीची अधिकृत लिंक
https://drive.google.com/file/d/1ySe5ca9ZaxM85t0bEDfQecnSCQQLgfOI/view