मुक्तपीठ टीम
बँक ऑफ बडोदामध्ये रिलेशनशिप मॅनेजर-कॉर्पोरेट अॅंड इंस्टंट क्रेडिट स्केल एसएमजी/ एस-४ या पदासाठी ७५ जागा, रिलेशनशिप मॅनेजर-कॉर्पोरेट अॅंड इंस्टंट क्रेडिट स्केल एमएमजी/ एस-३ या पदासाठी १०० जागा, क्रेडिट एनालिस्ट-कॉर्पोरेट अॅंड इंस्टंट क्रेडिट एमएमजी/ एस-३ या पदासाठी १०० जागा, क्रेडिट एनालिस्ट-कॉर्पोरेट अॅंड इंस्टंट क्रेडिट एमएमजी/ एस- २ या पदासाठी ५० जागा अशा एकूण ३२५ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १२ जुलै २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- पद क्र.१ – १) कोणत्याही शाखेतील पदवी २) फायनान्समधील स्पेशलायझेशनसह पदव्युत्तर पदवी/ किमान १ वर्षाचा डिप्लोमा ३) १० वर्षे अनुभव
- पद क्र.२- १) कोणत्याही शाखेतील पदवी २) फायनान्समधील स्पेशलायझेशनसह पदव्युत्तर पदवी/ किमान १ वर्षाचा डिप्लोमा ३) ०५ वर्षे अनुभव
- पद क्र.३- १) कोणत्याही शाखेतील पदवी +फायनान्समधील स्पेशलायझेशनसह पदव्युत्तर पदवी/ किमान १ वर्षाचा डिप्लोमा किंवा सीए/ सीएमए/ सीएस/ सीएफए २) ०५ वर्षे अनुभव
- पद क्र.४- १) कोणत्याही शाखेतील पदवी २) सीए केलेलं असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
पद क्र.१ साठी ३५ ते ४२ वर्षे, पद क्र.२ साठी २८ ते ३५ वर्षे, पद क्र.३ साठी २८ ते ३५ वर्षे, पद क्र.४ साठी २५ ते ३० वर्षे वय असावे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून ६०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी/ महिला उमेदवारांकडून १०० रूपये शुल्क आकारले जाणार आहे.
अधिक माहितीसाठी बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाइट https://www.bankofbaroda.in/ वरून माहिती मिळवू शकता.