मुक्तपीठ टीम
नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमध्ये ३०४ जागांसाठी भरती आहे. दहावी उत्तीर्ण, आयटीआय आणि अभियांत्रिकी डिप्लोमा केलेल्यांसाठी ही चांगली संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार ३१ मार्च २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, १) पद क्र.१- १० पास किंवा आयटीआय
२) पद क्र.२- आयटीआय (वेल्डिंग / फिटर / मशिनिस्ट/ मोटर मॅकेनिक / डिझेल मॅकेनिक / ऑटो इलेक्ट्रिशियन)
३) पद क्र.३- आयटीआय (इलेक्ट्रिकल)
४) पद क्र.४- (i) १०वी उत्तीर्ण / आयटीआय (ii) ब्लास्टर / मायनिंग मेट प्रमाणपत्र व प्रथमोपचार प्रमाणपत्र (iii) ब्लास्टिंग ऑपरेशनमध्ये ३ वर्षांचा अनुभव
५) पद क्र.५- (i) मॅकेनिकल इंजिनीअरिंग डिप्लोमा (ii) अवजड वाहन चालक परवाना असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
उमेदवाराचे वय १५ एप्रिल २०२१ पर्यंत १८ ते ३० वर्षे असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या जनरल आणि ओबीसी उमेदवारांकडून १५० रूपये शुल्क आकारले जाईल. तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी/ ईएक्सएसएम उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या अधिकृत वेबसाइट https://www.nmdc.co.in/वरून माहिती मिळवू शकता.