मुक्तपीठ टीम
सीमा सुरक्षा दलात मास्टर सब इंस्पेक्टर ग्रुप-बी, इंजिन ड्रायव्हर सब इंस्पेक्टर ग्रुप-बी, वर्क शॉप सब इंस्पेक्टर ग्रुप-बी, मास्टर हेड कॉन्स्टेबल ग्रुप-सी, इंजिन ड्रायव्हर हेड कॉन्स्टेबल ग्रुप-सी, वर्क शॉप हेड कॉन्स्टेबल ग्रुप-सी, कॉन्स्टेबल क्रू या पदांसाठी एकूण २८१ जागांवर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २८ जून २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- पद क्र.१- १) १२वी उत्तीर्ण २) द्वितीय श्रेणी मास्टर प्रमाणपत्र
- पद क्र.२- १) १२वी उत्तीर्ण २) प्रथम श्रेणी इंजिन ड्रायव्हर प्रमाणपत्र
- पद क्र.३- मेकॅनिकल इंजिनीअरिंग पदवी किंवा मेकॅनिकल/ मरीन/ ऑटोमोबाईल इंजिनीअरिंग डिप्लोमा
- पद क्र.४- १) १०वी उत्तीर्ण २) सेरंग प्रमाणपत्र
- पद क्र.५- १) १०वी उत्तीर्ण २) द्वितीय श्रेणी इंजिन ड्रायव्हर प्रमाणपत्र
- पद क्र.६- १) १०वी उत्तीर्ण २) औद्योगिक प्रशिक्षण संस्था डिप्लोमा
- पद क्र.७- १) १०वी उत्तीर्ण २) २६५ एचपीच्या खाली बोट चालवण्याचा एक वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २२ ते २८ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
पद क्र.१ ते ३ साठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून २०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, पद क्र.४ ते ७ साठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून १०० रूपये शुल्क आकारले जाणार आहे.
अधिक माहितीसाठी सीमा सुरक्षा दलाच्या अधिकृत वेबसाइट https://bsf.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.