मुक्तपीठ टीम
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात जिल्हास्तरावरील विशेषज्ञ, वरिष्ठ सल्लागार, समन्वयक आणि इतर पदांवर १६७ जागा, राज्यस्तरावरील संचालक, विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी, इंजिनीअर, लेखापाल आणि इतर पदांवर ८७ जागा अशा एकूण २५४ जागांवर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २६ फेब्रुवारी २०२२ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज करु शकतात. तर, अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख ०७ मार्च २०२२ आहे. ही भरती संपूर्ण महाराष्ट्रात होणार आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- जिल्हास्तरावरील पदांसाठी- एमडी/ कोणतीही वैद्यकीय पदवी/ बीई/ एमबीए/ एम.एससी/ कोणतीही पदव्युत्तर पदवी
- राज्यस्तरावरील पदांसाठी- एमडी/ सीए/ पदवीधर/ एम.एससी/ बी.ई/ पदव्युत्तर पदवी/ बी.फार्म/ १२वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते ३८ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकडून २०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, राखीव प्रवर्गातील उमेदवारांकडून १०० रूपये शुल्क आकारले जाणार आहे.
अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता
मा.आयुक्त आरोग्य सेवा तथा अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य भवन, ३रा मजला, सेंट जॉर्जेस रुग्णालय परिसर, पी. डिमेलो मार्ग, सी.एस.टी. जवळ, फोर्ट, मुंबई- ४००००१
अधिक माहितीसाठी महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकृत वेबसाइट arogya.maharashtra.gov.in वरून माहिती मिळवू शकता.