मुक्तपीठ टीम
सारस्वत बँकेत कनिष्ठ अधिकारी या पदावर भरती आहे. ही भरती १५० जागांसाठी आहे. पात्र आणि ईच्छुक उमेदवार ०३ एप्रिल २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.
शैक्षणिक पात्रता
या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार६०% गुणांसह पदवीधर वाणिज्य / विज्ञान / व्यवस्थापन अभ्यास किंवा ५०% गुणांसह वाणिज्य / विज्ञान / व्यवस्थापन अभ्यास पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदासाठी उमेदवारांचे कमाल वय ०१ फेब्रुवारी २०२१ रोजी २१ ते २७ वर्षांपर्यंत असावे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्यांसाठी ७५० रुपये शुल्क आकारलेले आहेत.
परीक्षा (ऑनलाईन): ०३ एप्रिल २०२१
अधिक माहितीसाठी सारस्वत बँकेच्या अधिकृत वेबसाइट https://www.saraswatbank.com/वरून माहिती मिळवू शकता.