Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

प्रोव्हिडंड फंड व्याजदराबद्दल काय झाला निर्णय?

September 6, 2026
in उपयोगी बातम्या, घडलं-बिघडलं
0
EPFO

मुक्तपीठ टीम

एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन (ईपीएफओ) ने चालू आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी भविष्य निर्वाह निधी ठेवीवरील व्याज दरासंबंधित एक दिलासादायक निर्णय घेतला आहे. संघटनेने व्याजदरामध्ये कोणताही बदल केलेला नसून मागील वर्षाप्रमाणे यंदाही ८.५० टक्के व्याज दिला जाणार आहे. ईपीएफच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या श्रीनगर येथे झालेल्या बैठक हा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोना संकटात केंद्र सरकारच्या उत्पनात घट झाली होती. तसेच या काळात अनेक कर्मचाऱ्यांनी पीएफ फंडातून मोठी रक्कम काढली होती. त्यामुळे ‘पीएफ’वरील व्याजदराला कात्री लागण्याची शक्यता होती. मात्र, गेल्या वर्षीप्रमाणेच ८.५० टक्के व्याज दर कायम ठेवल्याने जवळपास सहा कोटी पीएफ सभासदांना मोठा दिलासा मिळाला आहे.

 

मागील वर्षी मार्चच्या सुरुवातीस, ईपीएफओने व्याजदर कमी करून ८.५० टक्के केले होता. सात वर्षातील हा सर्वात कमी व्याज दर ठरला. यापूर्वी ३१ मार्च रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात ग्राहकांना दोन हप्त्यांमध्ये ८.५० टक्के व्याज देण्याचे मंडळाने नमूद केले होते. त्यातील एक हिस्सा ८.१५ टक्के आणि दुसरा ०.३५ टक्के चा होता.

गेल्या एका वर्षाच्या कालावधीत दोन कोटी पीएफ सभासदांनी पीएफ फंडातून ७३००० कोटी काढले होते. त्यात २०२१ च्शया पहिल्या तीन महिन्यांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कोरोनाशी लढताना पैशांची चणचण भासू नये यासाठी केंद्र सरकारने अनेक उपाययोजना केल्या होत्या. त्यापैकी भविष्यनिर्वाह निधी म्हणजेच पीएफमधील योगदान तीन महिन्यांसाठी १२ टक्क्यांवरून १० टक्क्यांवर आणून कर्मचाऱ्यांच्या हातात अधिक वेतन यावे अशी सोय केली होती.

व्याज दरात असे झाले बदल..

  • २०१६-१७ मध्ये आपल्या सभासदांना ८.६५ टक्के सन २०१७-१८ मध्ये ८.५५ टक्के व्याज दिले होते.
  • २०१५-१६ मध्ये व्याजदर ८.८ टक्क्यांपेक्षा थोडी जास्त होती.
  • तसेच २०१३-१४ सोबत २०१४-१५ मध्ये ८.७५ टक्के व्याज दर दिला होता.

Tags: EPFinterest rateProvident Fundएम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशनभविष्य निर्वाह निधी
Previous Post

सारस्वत बँकेत १५० जागांसाठी भरती, करिअरची चांगली संधी

Next Post

महाराष्ट्राच्या १५०० कोटींच्या विकास कर्ज रोख्यांची विक्री

Next Post
maharashtra-mantralaya

महाराष्ट्राच्या १५०० कोटींच्या विकास कर्ज रोख्यांची विक्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!