मुक्तपीठ टीम
इंटेलिजन्स ब्युरोनं सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी पदाच्या १५० जागांसाठी अर्ज मागवले आहेत. अर्जाची प्रक्रिया १६ एप्रिल २०२२ पासून सुरू होईल. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ७ मे २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतभर आहे. अधिक माहितीसाठी व्हिडीओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली संबधित बातमीची लिंक क्लिक करा आणि मुक्तपीठच्या वेबसाईटला भेट द्या.
शैक्षणिक पात्रता
- ही भरती ग्रेड-2/तांत्रिक अंतर्गत ACIO च्या पदांवर केली जाणार आहे.
- इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन, संगणक विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान, संगणक विज्ञान, संगणक अभियांत्रिकी, संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकीमध्ये वैध GATE स्कोअर २०२०, २०२१ आणि २०२२ असणे आवश्यक आहे.
- इलेक्ट्रॉनिक्स, भौतिकशास्त्रासह विज्ञानातील पदव्युत्तर पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स किंवा कम्युनिकेशन किंवा संगणक विज्ञान, संगणक अनुप्रयोगातील पदव्युत्तर पदवी असणं आवश्यक आहे.
वयोमर्यादा
- उमेदवाराचे वय १८ वर्षांपेक्षा कमी आणि २७ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
- राखीव प्रवर्गातील उमेदवारांना केंद्र सरकारच्या नियमांनुसार कमाल वयोमर्यादेत सूट दिली जाते.
शुल्क
- उमेदवारांना १०० रुपये शुल्कही भरावं लागणार आहे.
- एससी, एसटी, महिला आणि माजी सैनिक उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावं लागणार नाही.
अधिक माहितीसाठी केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइट mha.gov.in वरून माहिती मिळवू शकता.