मुक्तपीठ टीम
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात कक्ष अधिकारी/ अधीक्षक, उच्चश्रेणी लघुलेखक, सहायक लेखापाल, निम्नश्रेणी लघुलेखक, सांख्यिकी सहायक, वरिष्ठ सहायक, विद्युत पर्यवेक्षक, छायाचित्रकार, वरिष्ठ लिपिक/ डीईओ, लघुटंकलेखक, आर्टिस्ट कम ऑडिओ व्हिडीओ एक्सपर्ट, लिपिक कम टंकलेखक, वीजतंत्री, वाहनचालक, शिपाई या पदांसाठी एकूण १२२ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ०७ सप्टेंबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण नाशिक आहे. या बातमीविषयी अधिक माहितीसाठी व्हिडीओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली संबंधित बातमीची लिंक क्लिक करा आणि मुक्तपीठच्या वेबसाइटला भेट द्या.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- पद क्र.१- १) कोणत्याही शाखेतील पदवी २) ३ ते ६ वर्षे अनुभव
- पद क्र.२- १) १०वी उत्तीर्ण २) इंग्रजी लघुलिपी व टायपिंग ३) ३ वर्षे अनुभव
- पद क्र.३- १) बीकॉम २) ०३ वर्षे अनुभव
- पद क्र.४- १) १०वी उत्तीर्ण २) इंग्रजी लघुलिपी व टायपिंग ३) ३ वर्षे अनुभव
- पद क्र.५- ४५% गुणांसह सांख्यिकी/बायोमेट्रिक्स /अर्थशास्त्र/गणिती अर्थशास्त्र/गणित पदव्युत्तर पदवी किंवा एमसीए
- पद क्र.६- १) कोणत्याही शाखेतील पदवी २) ३ वर्षे अनुभव
- पद क्र.७- १) इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग पदवी/ डिप्लोमा किंवा इलेक्ट्रिशियन/ वायरमन आयटीआय २) ३ वर्षे अनुभव
- पद क्र.८- १) १२वी उत्तीर्ण २) फोटोग्राफी/ कमर्शियल आर्ट्स/ फाइन आर्ट्स डिप्लोमा किंवा फोटोग्राफी सिनेमेटोग्राफी
- कोर्स ३) ३ वर्षे अनुभव
- पद क्र.९- १) १२वी उत्तीर्ण २) इंग्रजी टायपिंग व मराठी टायपिंग
- पद क्र.१०- १) १०वी उत्तीर्ण २) लघुलिपी ३) इंग्रजी टायपिंग व मराठी टायपिंग
- पद क्र.११- १) १२वी उत्तीर्ण २) अप्लाइड आर्ट्स किंवा फाइन आर्ट्स सह फोटोग्राफी डिप्लोमा ३) ०१ वर्ष अनुभव
- पद क्र.१२- १) १०वी उत्तीर्ण २) इंग्रजी टायपिंग व मराठी टायपिंग
- पद क्र.१३- १) १२वी उत्तीर्ण २) इलेक्ट्रिशियन आयटीआय ३) ५ वर्षे अनुभव
- पद क्र.१४- १) १०वी उत्तीर्ण २) अवजड वाहनचालक परवाना ३) ३ वर्षे अनुभव
- पद क्र.१५- १०वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते ३८ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकडून १ हजार रूपये शुल्क आकारले जाणार तर, मागासवर्गीय उमेदवारांकडून ७०० रूपये आकारले जाणार आहे.
अधिक माहितीसाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाइटवरून खालील लिंकवरून माहिती मिळवू शकता:
https://muhs.ac.in/showpdf.aspx?src1=upload/Advertisement_no_09_2022_250722_https.pdf
https://recruitment.muhs.ac.in/rec_application_form_dashboard.aspx