मुक्तपीठ टीम
पंजाब नॅशनल बँकेत फायर-सेफ्टी ऑफिसर या पदासाठी २३ जागा, सिक्योरिटी मॅनेजर या पदासाठी ८० जागा अशा एकूण १०३ जागांवर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ३० ऑगस्ट २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- पद क्र.१- बीई/ बीटेक + ०१ वर्ष अनुभव किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + विभागीय अधिकारी अभ्यासक्रम+ १ वर्ष अनुभव किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + सब-ऑफिसर कोर्स/ स्टेशन ऑफिसर अभ्यासक्रम + ३ वर्षे अनुभव
- पद क्र.२- १) कोणत्याही शाखेतील पदवी २) लष्कर/ नौदल/ हवाई दलात ५ वर्षांची सेवा असलेले अधिकारी किंवा किमान ५ वर्षांच्या सेवेसह केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात उप-अधीक्षक किंवा सहायक कमांडंट किंवा समकक्ष रँक असलेले राजपत्रित पोलीस अधिकारी असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २१ ते ३५ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून १ हजार ३ रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी उमेदवारांकडून ५९ रूपये शुल्क आकारले जाणार आहे.
अधिक माहितीसाठी पंजाब नॅशनल बँकेच्या अधिकृत वेबसाइट https://www.pnbindia.in/ वरून माहिती मिळवू शकता.
पद क्र. १ साठी अर्ज करण्याची अधिकृत लिंक
https://drive.google.com/file/d/1KiFKDKYdO0WqJ3WTwmb3EUXPjGPp2aqw/view
पद क्र. २ साठी अर्ज करण्याची अधिकृत लिंक
https://drive.google.com/file/d/1AyYajx1YmgOBSI2ZNsnDf_86gZUN-QJz/view








Subscribe