मुक्तपीठ टीम
इंडिया सिक्योरिटी प्रेस नाशिक येथे टेक्निकल जुनियर टेक्निशियन या पदासाठी ३० जागा, कंट्रोल जुनियर टेक्निशियन या पदासाठी ३८ जागा, टेक-सपोर्ट डिझाईन जुनियर टेक्निशियन या पदासाठी ०२ जागा, मशीन शॉप जुनियर टेक्निशियन या पदासाठी ०४ जागा, इलेक्ट्रिकल जुनियर टेक्निशियन या पदासाठी ०२ जागा, इलेक्ट्रॉनिक जुनियर टेक्निशियन या पदासाठी ०२ जागा, स्टोअर जुनियर टेक्निशियन या पदासाठी ०२ जागा, सीएसडी जुनियर टेक्निशियन या पदासाठी ०५ जागा अशा एकूण ८५ जागांसाठी ही नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ०८ नोव्हेंबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण नाशिक आहे. या पदांसाठी घेण्यात येणारी परिक्षा ही डिसेंबर २०२२ ते जानेवारी २०२३ या दरम्यान घेतली जाईल.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- पद क्र.१ आणि पद क्र. २ साठी- प्रिंटिंग ट्रेड-लिथो ऑफसेट मशीन माइंडर/लेटर प्रेस मशीन माइंडर/ऑफसेट प्रिंटिंग/प्लेटमेकिंग/इलेक्ट्रोप्लेटिंग या श्रेत्रात एनसीव्हीटी/ एससीव्हीटी आयटीआय किंवा प्लेट मेकर-कम-इम्पोझिटर/हँड कंपोझिंगमध्ये आयटीआय किंवा प्रिंटिंग टेक्नोलॉजी डिप्लोमा केलेला असावा.
- पद क्र.३- एंग्रावेर/प्लेटमेकर (लिथोग्राफिक) मध्ये एनसीव्हीटी/ एससीव्हीटी आयटीआय
- पद क्र.४, पद क्र.७ आणि पद क्र.८- फिटर क्षेत्रात एनसीव्हीटी/ एससीव्हीटी आयटीआय
- पद क्र.५- इलेक्ट्रिकल क्षेत्रात एनसीव्हीटी/ एससीव्हीटी आयटीआय
- पद क्र.६- इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात एनसीव्हीटी/ एससीव्हीटी आयटीआय
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते २५ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून ६०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी उमेदवारांकडून २०० रूपये शुल्क आकारले जातील.
अधिक माहितीसाठी भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाइट https://ispnasik.spmcil.com/Interface/Home.aspx वरून माहिती मिळवू शकता.
नोकरीची लिंक
https://ibpsonline.ibps.in/ispnjtwnov20/
अधिकृत जाहिरात
https://drive.google.com/file/d/19Sc0gUutg9214aJ58k5UcJj0Gm-xLq-w/view