मुक्तपीठ टीम
कोरोनाविषयी लोकांचा वाढता निष्काळजीपणा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नुकत्याच झालेल्या निवडणुका, लग्न समारंभ तसेच लोकलसह सार्वजनिक वाहतूक सेवेतून लोकांचा वाढलेला प्रवास या गोष्टींमुळे महाराष्ट्रात पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढला असल्याचा अहवाल केंद्रीय पथकाने आपल्या दौऱ्यानंतर काढला आहे. याच वेळी त्यांनी कोरोना चाचण्या करणारी आरोग्य यंत्रणा गांभीर्याने काम करत नसल्याचे अहवालात नमूद केले आहे.
अहवालात नमूद केले कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाची कारणे-
- केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव निपुण विनायक यांच्यासह तीन जणांच्या तज्ज्ञ पथकाने १ व २ मार्च रोजी महाराष्ट्राचा दौरा करून कोरोना स्थितीची पाहणी केली.
- या समितीने अहवालात म्हटले आहे की, सध्या लग्नसभासमारंभ सुरू आहेत. अशा गोष्टींतून महाराष्ट्रात पुन्हा कोरोना साथीचा मोठ्या प्रमाणावर फैलाव होत आहे.
- सप्टेंबरनंतर कोरोना साथीचा जोर कमी झाल्याने आरोग्य यंत्रणाही सुस्तावली आहे. याचा परिणाम म्हणून आता महाराष्ट्रात कोरोनाचा फैलाव वाढला आहे.
- लोकलसह इतर सर्व सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू करणे अशा काही गोष्टींमुळे कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढला आहे.
पथकाने दिलेल्या सूचना
- महाराष्ट्र सरकारने कोरोना चाचण्यांची संख्या वाढविणे.
- रुग्णांचा वेगाने शोध घेणे.
- कोरोनाचा मोठा फैलाव झालेल्या भागांत नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यावर लक्ष केंद्रित करावे
- काँटॅक्ट ट्रेसिंगवर भर द्यावा. लसीकरण ठेवावे.
महाराष्ट्रात कोरोना चाचण्यांसाठी लोक स्वत: हून पुढे येण्याचे प्रमाणही कमी आहे.
महाराष्ट्रात आणि पंजाबमध्ये कोरोनाचा संसर्ग वाठल्याने केंद्राने या दोन्ही राज्यांमध्ये तातडीने विशेष आरोग्य पथकाने पाठवले होते.