मुक्तपीठ टीम
भारतीय नौदलाचा ‘स्वार्ड आर्म’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पश्चिम ताफ्याचे (fleet) रिअर अॅडमिरल अजय कोचर यांनी सक्सेना यांच्याकडे २७ डिसेंबर २१ रोजी ‘बॅटन’ सुपूर्द केल्यामुळे नेतृत्व बदलले आहे. कोचर नवी दिल्ली येथील ‘एटीव्हिपी’ मुख्यालयात “प्रकल्प संचालक” (ऑपरेशन्स आणि ट्रेनिंग) म्हणून कार्यभार स्वीकारत आहेत.
ऍडमिरल सक्सेना यांची भारतीय नौदलात ०१ जुलै १९८९ रोजी नियुक्ती झाली. ते खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी आहेत. डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज, वेलिंग्टन आणि नेव्हल वॉर कॉलेज, न्यूपोर्ट, यूएसए. एक नेव्हिगेशन आणि डायरेक्शन स्पेशालिस्ट आहेत. त्याच्या आत्तापर्यंतच्या महत्त्वाच्या नियुक्त्यामध्ये “आयएनएस विराट” च्या डायरेक्शन टीमचा भाग आणि “कुठार, गोदावरी आणि दिल्ली” या भारतीय नौकांचे नेव्हिगेटिंग ऑफिसर या अत्यंत महत्त्वाच्या पदांचा समावेश होतो. त्यांनी “आयएनएस मुंबई” या विनाशिकेचे क्रमांक दोनचे, जोखमीचे कार्यकारी अधिकारी { एक्सिक्युटिव्ह ऑफिसर} म्हणूनही काम केले. त्यांच्या कमांडच्या कार्यकाळात मॉरिशस तटरक्षक नौका गार्डियन आणि भारतीय नौदल नौका ‘कुलिश’ आणि ” म्हैसूर ” विनाशिकेचा समावेश आहे. ते नौदलाच्या पश्चिम मुख्यालयात “ऑपरेशन्स ऑफिसर” देखील होते.
ऍडमिरल सक्सेना यांनी ‘डिफेन्स अॅकॅडमी आणि सेंटर फॉर लीडरशिप अँड बिहेवियरल स्टडीज’ येथे प्रशिक्षण घेतले आहे. त्यांच्या नियुक्त्यांमध्ये कार्मिक संचालनालयातील कार्यकाळ आणि नौदल प्रमुखांचे नौदल सहाय्यक, परदेशी सहकार्याचे प्रधान संचालक आदींचा समावेश होतो. ते लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयात नौदल सल्लागारही होते. ध्वजपदी पदोन्नती मिळाल्यावर त्यांनी ०५ फेब्रुवारी २०२० रोजी सहाय्यक नौदल प्रमुख (नीती आणि योजना) म्हणून कार्यभार स्वीकारला.