मुक्तपीठ टीम
जुन्या नोटा आणि नाणी खरेदी/विक्रीच्या फसव्या ऑफरला बळी पडू नका, असे भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) लोकांना सावध केले आहे. केंद्रीय बँकेने एका अधिसूचनेद्वारे हे आवाहन केले आहे.
केंद्रीय बँकेने अधिसूचनेत म्हटले आहे, “भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निदर्शनास आले आहे की, काही घटक लोकांकडून शुल्क/कमिशन/कर मागण्यासाठी RBI चे नाव/लोगो वापरून फसवणूक करत आहेत. ऑनलाईन किंवा ऑफलाईन मार्गाने जुन्या बँकेच्या नोटा आणि नाण्यांच्या खरेदी, विक्रीच्या बनावट ऑफर दिल्या जात आहेत.”
— RBI Says (@RBIsays) August 4, 2021
अशा व्यवहारामध्ये आपल्या वतीने फी/कमिशन गोळा करण्यासाठी कोणत्याही संस्था/फर्म/व्यक्ती इत्यादींना अधिकृत केलेले नाही असे आरबीआयने स्पष्ट केले. अशा फसव्या ऑफरद्वारे पैशांची अफरातफर करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे नाव वापरणाऱ्या घटकांना बळी न पडण्याचा सल्ला रिझर्व्ह बँकेने दिला.