Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महाराष्ट्रातील आणखी एका बँकेचा परवाना रिझर्व्ह बँकेकडून रद्द

December 7, 2021
in घडलं-बिघडलं
0
RBI

मुक्तपीठ टीम

उस्मानाबाद – रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कारवाईचा बडगा उगारत उस्मानाबादच्या वसंतदादा नागरी सहकारी बँकेचा महाराष्ट्रात बँकिंग व्यवसाय करण्याचा परवाना रद्द केला आहे. रिझर्व्ह बँकेने म्हंटले आहे की, ही बँक आरबीआयने दिलेले निर्देश आणि नियमांचे पालन करण्यात अपयशी ठरली आहे. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. ११ जानेवारीला आदेश काढून याच तारखेपासून त्याची अंमलबजावणी करण्याचे सहकार विभागाला निर्देशही देण्यात आले आहे. त्याचबरोबर बँकेवर अवसायक नेमकण्याचे देखील सांगण्यात आले आहे. आरबीआयची ही सहकारी बँकेवर मोठी कारवाई मानली जातीय.

 

सहकारी आयुक्त आणि सहकारी संस्था निबंधक यांनाही बँकेला वळण लावण्याचे आणि आदेश जारी केले असून बँकेवर लिक्विडेटर नेमण्याची विनंती केली आहे. तसेच बँकेची सध्याची आर्थिक स्थिती पाहता बँक आपल्या सध्याच्या ठेवीदारांना ठेवी देण्यास असमर्थ ठरेल, जनतेच्या हितासाठी आणि बँकेच्या व्यावहाराच्या उल्लंघण करण्याद्वारे त्यांच्या ठेवीदारांच्या हितासाठी हानिकारक मार्गाने रोखणे आवश्यक आहे. त्यामुळे ११ जानेवारी पासून बँकेचे व्यवहार बंद करून बँकिंग परवाना रद्द केल्याचे आदेश जारी केले आहे, असे आरबीआयने सांगितले.

 

बँकिंगचा परवाना रद्द केल्याने आणि तरलता प्रक्रिया सुरू झाल्यास, डीआयसीजीसी अधिनियम १६१.१ वसंतदादा नागरी सहकारी बँक लि. उस्मानाबाद महाराष्ट्रातील ठेवीदारांना पैसे देण्याची प्रक्रिया सुरू होईल, असे आरबीआयकडून सांगण्यात आले आहे. बँकेतील बहुतांश ठेवीदारांना त्यांच्या ठेवीची संपूर्ण परतफेड डीआयसीजीसीकडून मिळेल, असे देखील त्यात सांगण्यात आले आहे.

 

वसंतदादा नागरी सहकारी बँकेवर आरबीआयने २०१७ साली पहिली कारवाई केली होती. या कारवाईत नवीन ठेवी स्वीकारण्यास बँकेवर बंदी घातली होती. तसेच बँकेतील हजारो ठेवीदारांना एक हजार रुपये याप्रमाणे ठेवी परत केल्या जात होत्या. तसेच बँकेला प्रत्येक वेळी ६ महिन्याच्या मुदतीवर वसुली करून, बँकेचा कारभार सुधारण्याची संधी दिली होती. मात्र सुधारणा न झाल्याने आरबीआयने सोमवारी ही कारवाई केली आहे.


Tags: MaharashtraMaharashtra bankRBIRBI cancels licenseरिझर्व्ह बँक ऑफ इंडियावसंतदादा नागरी सहकारी बँक
Previous Post

कोरोना लसीसाठी झेड प्लससारखी सुरक्षा! पुणे ते मुंबई सुरक्षेबरोबरच वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर!!

Next Post

मोदी सरकारच्या कृषी कायद्यांना सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती!!

Next Post
supreme-court

मोदी सरकारच्या कृषी कायद्यांना सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!