Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून माजी राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी राबवली ‘मी रक्तदाता’ संकल्पना

June 7, 2021
in घडलं-बिघडलं
0
ravindra waikar

मुक्तपीठ टीम

राज्यात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी तसेच सर्वसामान्य नागरीकांचे प्राण वाचविण्यासाठी शासन-प्रशासन, आरोग्य यंत्रणा, पोलीस विभाग, सफाई कर्मचारी, दिवस रात्र, सामाजिक संस्था, संघटना तसेच मंडळे आपली जबाबदारी पार पाडत आहेत. भविष्यातील रक्तपेढ्यांमधील रक्तांची कमतरता भासु नये म्हणुन तसेच रुग्णांच्या उपचारार्थ रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा साठा करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे आदरणिय  उद्धव ठाकरे यांनी जनतेला रक्तदान करण्याची आवाहन केले आहे. त्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत तसेच सामाजिक जाणिवेची भावना लक्षात घेऊन जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्राचे शिवसेनेचे आमदार तसेच माजी राज्यमंत्री रविंद्र वायकर यांच्या संकल्पनेतून जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्राच्यावतीने शिवराज्याभिषेका दिनी  ‘मी रक्तदाता’ ही संकल्पना राबवली.

 

जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्र
..शिवराज्याभिषेका दिवशी ‘मी रक्तदाता’ संकल्पनेतून १३५ लोकांनी केले रक्तदान.

– महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री @OfficeofUT ji यांच्या आवाहनाला प्रतिसाद.
शिवसेनेचे आमदार तसेच माजी राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी राबवली ‘मी रक्तदाता’ ही संकल्पना* pic.twitter.com/BhYStRLDFr

— Ravindra Waikar (@RavindraWaikar) June 6, 2021

 

जोगेश्‍वरी (पूर्व) शामनगर तलाव येथे आयोजित रक्तदान शिबीरात ‘रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान’ असल्याने विधानसभा क्षेत्रातील विविध गृहनिर्माण संस्था, सामाजिक संस्था, विविध मंडळे, तरुण युवक मित्र मंडळ यांनी रक्तदान केले. यात सफाई कर्मचारी यांनी देखिल आपली सामाजिक जाणीवेची जबाबदारी पार पाडीत रक्तदान केले. या शिबीरात एकुण १३५ रक्ताच्या बाटल्या जमा झाल्या. या शिबीराचे उद्घाटन वायकर यांच्या हस्ते तसेच सेवह हिल रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी महारुद्र कुंभार यांच्या उपस्थितीत करण्यात आले. सेवन हिल रुग्णालयाच्या मदतीने आयोजित या रक्तदान शिबीरात रक्तदात्यांना वाफेचे भांडे, मास्क, कप, रत्नागिरी जिल्ह्याची परिपुर्ण माहिती असलेले पुस्तक तसेच प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी कोरोनाच्या काळात दिवस रात्र मेहनत करणार्‍या करोना योद्धांचा प्रमाणपत्र व  मानचिन्ह देऊन कोरोना योद्धांचा सन्मान करण्यात आला. शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधित नुतनीकरण करण्यात आलेल्या सेवालय कार्यालयाचे उद्घाटन वायकर यांच्या हस्ते करण्यात आले.

 

यावेळी डॉ. राहुल महाले, विधानसभा संघटक विश्वनाथ सावंत, महिला विधानसभा संघटक रचना सावंत, शालिनी सावंत, उपविभागप्रमुख जितेंद्र वळवी, बाळा साटम, जयवंत लाड, के. एल. पाठक, नगरसेवक बाळा नर, नगरसेविका रेखा रामवंशी, शाखाप्रमुख मंदार मोरे, नंदु ताम्हणकर, प्रदिप गांधी, संदिप गाढवे, महिला उपविभाग संघटक  प्रियंका आंबोळकर, शिवसेनेचे अन्य पदाधिकारी, शिवसैनिक, युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. याआधी विधानसभा क्षेत्रातील शिवसेनेच्या काही शाखांनी ट्रामा केअर रुग्णालयाच्या मदतीने रक्तदान शिबीराचे आयोजनकेले आहे


Tags: chief minister uddhav thackerayravindra waikarShivsenaजोगेश्वरीमी रक्तदातामुख्यमंत्री उद्धव ठाकरेरवींद्र वायकर
Previous Post

मराठ्यांनो, राजकीय गुलामगिरीतून बाहेर पडून समाजाचा विचार कधी करणार?

Next Post

“वाराला प्रतिवार करणे ही तर छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण”

Next Post
chandrakant patil-ajit pawar

"वाराला प्रतिवार करणे ही तर छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!