Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कंत्राटदारांनी कार्य मंजुरी आदेशानुसार कालमर्यादा पाळावी- रवींद्र चव्हाण

October 1, 2022
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
Public Works Minister Ravindra Chavan

मुक्तपीठ टीम

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्य मंजुरी आदेशानुसार कालमर्यादा पाळणे बंधनकारक असून याचे उल्लंघन करणाऱ्या  कंत्राटदारांची  माहिती सादर करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिल्या.

मंत्रालयात आयोजित सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत क्षेत्रीय स्तरावरील प्रादेशिक विभाग कोकण,नवी मुंबई या विभागातील तसेच राष्ट्रीय महामार्गाच्या कामांबाबतच्या आढावा बैठकीत मंत्री चव्हाण यांनी हे निर्देश दिले. या बैठकीस संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत करण्यात येणाऱ्या सर्व कामांची गुणवत्ता  राखण्यासाठी तसेच  विभागाला प्राप्त निधीचा विनियोग योग्य प्रकारे करण्यासाठी यंत्रणा प्रमुखांनी खबरदारी घ्यावी. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्य मंजुरी आदेश देण्यात आल्या नंतरही काम सुरू न केलेले त्यासोबतच कार्यादेशात नमूद कालावधीत काम प्रगतीपथावर नसलेल्या कंत्राटदारांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल. संबंधित यंत्रणांनी अशा कामांची आणि कंत्राटदार यांची माहिती सादर करावी. तसेच  स्थानिक रोजगार वृद्धीसाठी या ठिकाणी कोणकोणते नाविन्यपूर्ण उपक्रम राबविता येईल, यादृष्टीने स्थानिक परिस्थितीचा अभ्यास, संशोधन करून यंत्रणांनी नवकल्पना सूचवाव्यात असे सूचित मंत्री चव्हाण केले.

चव्हाण यांनी मंजूर कामांचा सविस्तर आढावा घेऊन कंत्राटदाराने विहीत कालावधीत दर्जेदार काम करणे बंधनकारक आहे. त्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने यंत्रणांनी सर्तक रहावे. तसेच  पुल, रस्ता दुरुस्तीची कामे तत्परतेने करून जनतेची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी. क्षेत्रीय अधिकारी यांनी स्थळपाहणी करून कामे विहीत कालावधीत पूर्ण करण्याला प्राधान्य द्यावे.

आवश्यक तिथे स्थानिक यंत्रणांनी ग्रामीण भागात पूल बांधण्यासाठी गावकऱ्यांना विश्वासात घेऊन,  जनजागृती करून गावात येण्या जाण्यासाठी पूलाची आवश्यकता पटवून देत  गावात असलेली जागा ग्रामसभेकडून उपलब्ध करून पूल बांधणी करावी. रायगड किल्ल्यावरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या सर्व कामांची पूर्तता वेळेत आणि दर्जात्मक करण्याचे निर्देश चव्हाण यांनी संबंधितांना दिले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणांतंर्गत  कल्याण निर्मल रस्ता राष्ट्रीय महामार्ग ६१ च्या कामांचाही मंत्री चव्हाण यांनी आढावा घेतला.


Tags: ContractorsmuktpeethPublic Works Minister Ravindra ChavanTime LimitWork Sanction Orderकंत्राटदारकार्य मंजुरी आदेशकालमर्यादाघडलं-बिघडलंमुक्तपीठसार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण
Previous Post

एक 5G नेटवर्क, १० मोठे फायदे! समजून घ्या…

Next Post

स्वच्छ, सुंदर आणि कचरामुक्त शहरे लोकचळवळ बनावी- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post
स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० चा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ 4 (1).jpg

स्वच्छ, सुंदर आणि कचरामुक्त शहरे लोकचळवळ बनावी- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!