Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“ड्रग, कंगना, हिंदू-मुस्लिम” या साऱ्यापासून वेगळा अजेंडा, स्वाभिमानी शेतकरीचे कापूस, सोयाबिन प्रश्नांवर अन्नत्याग आंदोलन!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Ravikant Tupkar indefinite fast in Nagpur for farmers

मुक्तपीठ टीम

शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना बुधवारपासून नागपुरात अन्नत्याग आंदोलन करणार आहेत. स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन होणार असून ते स्वत: आमरण उपोषण करणार आहे. ते नागपूरच्या संविधान चौकात उपोषणाला बसणार आहेत.

 

प्रत्येक गावांमध्ये प्रभातफेरी काढण्यात येणार

  • मराठवाडा, विदर्भातील प्रत्येक गावात प्रभात फेरी
  • विदर्भाप्रमाणाचे मराठवाड्यात देखील मोठ्या प्रमाणात कापूस उत्पादन शेतकरी आहेत.
  • खर्चाच्या तुलनेमध्ये कापसाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.
  • शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा यासाठी १८ नोव्हेंबरला स्वाभिमानींच्या वतीने मराठवाडा आणि विदर्भातील प्रत्येक गावांमध्ये प्रभातफेरी काढण्यात येणार आहे.
  • तसेच याच दिवशी धरणे आणि ठिय्या आंदोलनाच्या माध्यमातून संघटनेच्या वतीने जोरदार शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे.
  • कापूस आणि सोयाबीनला योग्य भाव मिळावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे.
  • आपल्या मागणीसाठी तुपकर हे मंळवारपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात करणार आहेत.

 

…तोपर्यंत शांत बसणार नसल्याचे तुपकरांचे आवाहन

  • त्यानंतर १९ नोव्हेंबरला आपल्या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने विदर्भ आणि मराठवाड्यात विविध ठिकाणी रास्तारोको आंदोलन देखील करण्यात येणार आहे.
  • जोपर्यंत सरकार शेतकऱ्यांची दखल घेत नाही.
  • शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचे तुपकर यांनी म्हटले आहे.
  • आमचा हा लढा कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी असून, जोपर्यंत मालाला योग्य भाव मिळणार नाही, तोपर्यंत शांत बसणार नसल्याचेही ते म्हणाले आहेत.

 

तुपकर यांना पोलिसांचे पत्र

  • दरम्यान त्रिपुरामध्ये मशिदीवर झालेल्या कथील हल्ल्याचे पडसाद विदर्भात उमटल्याचे पहायला मिळाले होते.
  • अमरावतीमध्ये हिंसाचार उसळला होता, जमावाकडून दगडफेक करण्यात आली होती.
  • या पार्श्वभूमीवर शहरात संचारबंदी करण्यात आली आहे.
  • संचारबंदी असल्याने तुपकर यांनी आंदोलन कुरू नये असे पोलिसांनी म्हटले आहे.
  • आंदोलनासंदर्भांत पोलिसांनी तुपकर यांना एक पत्र देखील पाठवले आहे.
  • ज्यामध्ये संचारबंदी असल्याने आंदोलन करू नका असे म्हटले आहे.

Tags: nagpurravikant tupkarswabhimani shetkari sanghadnaनागपूरमराठवाडारविकांत तुपकरसोयाबीनस्वाभिमानी शेतकरी संघटना
Previous Post

हिंमत असेल तर केंद्रातील सरकार बरखास्त करुन बॅलेटपेपरवर निवडणुका घ्या!: नाना पटोले

Next Post

गतिमानता व गुणवत्ता वाढीसाठी राज्यात पुन्हा ‘महा आवास अभियान’ – हसन मुश्रीफ

Next Post
Hasan Mushrif

गतिमानता व गुणवत्ता वाढीसाठी राज्यात पुन्हा ‘महा आवास अभियान’ - हसन मुश्रीफ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!