Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

रत्नागिरीच्या उक्षीतील सुधीर घाणेकरच्या ‘ऑस्करची गोष्ट’ लघुपटाची युकेत मोठी झेप!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या, प्रेरणा
0
Sudhir Ghanekar

मुक्तपीठ टीम

जिद्द आणि परिश्रमाच्या जोरावर प्रयत्नांना यश मिळतच मिळत. रत्नागिरी तालुक्यातील उक्षी गावचे सुपुत्र सुधीर घाणेकर यांची संघर्षगाधा अशीच आहे. चिकाटी आणि मेहनतीच्या बळावर सुधीर घाणेकर यांच्या “ऑस्करची गोष्ट” या लघुचित्रपटाची युकेच्या लिफ्ट ऑफ फिल्म फेस्टिव्हल तसेच सिनेमेकिंग इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये १७१ देशामधून आलेल्या लघुचित्रपटांमध्ये निवड झाली आहे. त्यामुळे रत्नागिरीच्या या तरुणाच्या लघुपटाने युकेत मोठी झेप घेतली आहे.

 Sudhir Ghanekar

प्रतिकूल परिस्तिथीवर मात करत अभिनयाच्या जोरावर आज सुधीर घाणेकर यांना मोठं यश मिळालं आहे. सुधीर घाणेकर यांचे वडिल हे शेतकरी आहेत. आई- वडील, तीन भावडांचं त्यांचं कुटुंबं आहे. सुधीर यांनी रात्रीच्या शाळेत शिकत आपलं प्राथमिक शिक्षण उक्षी आणि माध्यमिक शिक्षण पोचरी शाळेत पुर्ण केले. शाळेच्या वार्षिक महोत्सवात कधी कृष्णाचा अवतार तर कधी नमनात पेंद्या, गौळण बनून ते आपली कला लोकांसमोर सादर करायचे. परेलच्या एमडी कॉलेजमध्ये बी कॉम पर्यंत त्यांनी शिक्षण पूर्ण केले.

अभिनयात काहीतरी वेगळं करण्याचं स्वप्न त्यांनी पाहिलं आणि ते साकारही केलं. “ऑस्करची गोष्ट” या लघुपटात सुधीर यांनी दिग्दर्शक, लेखक, कलादिग्दर्शक, वेशभूषा, कॅमेरामन, कास्टिंग, पोस्ट प्रॉडक्शन अशा अनेक भूमिका सांभाळल्या. या लघुपटाचे संपुर्ण चित्रिकरण स्मार्टफोनवरुन करण्यात आले आहे. सुधीर यांचं ‘सताक्षी 18 क्रिएशन’ नावाचं प्रॉडक्शन हाऊस देखील आहे. “ऑस्करची गोष्ट” हा लघुचित्रपट विविध राजकीय आणि आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सवात सादर करण्यात आला.

 Sudhir Ghanekarकोण सुधीर घाणेकर?

  • सुधीर घाणेकर यांचा जन्म ११ फेब्रुवारी १९९२ रोजी रत्नागिरी तालुक्यातील उक्षी गावात झाला.
  •  त्यांनी कोकणातील प्रसिद्ध अशा नमन या लोककलेपासून अभिनयाची सुरुवात केली.
  • “पेनल्टी” या चित्रपटातून सुधीर घाणेकर याने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले.
  • कलर्स मराठीवरील “साज नवा, रंग नवा”, “अस्स् सासर सुरेख बाई”, “राधा प्रेम रंगी रंगली” आणि कलर्स गुजराती वाहिनीवरील “प्रीत पिऊ ना पन्नाबेन”, “कुमकुम ना पगल्या पाडा” या वाहीनीत काम केले आहे.
  • सोनी मराठी वाहिनीवरील “इयर डाउन”,”श्रीराम समर्थ” या मराठी चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केल आहे.
  • “संकल्प” आणि “स्त्री & पुरुष” या लघुपटात क्रिएटीव्ह दिग्दर्शक म्हूणन काम केले आहे.
  • सुधीर घाणेकर यांनी “फुंकर”, “पटरी बॉइज”, “श्रीराम समर्थ ” या चित्रपटात अभिनेता म्हणून काम केले आहे.

युकेच्या लिफ्ट ऑफ फिल्म फेस्टिव्हल व सिनेमेकिंग इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलची तिसरी आणि अंतिम फेरी युकेतील पाईनवुड स्टुडिओमध्ये ४ जुलै ते १८ जुलै २०२२ पर्यंत आहे. त्यामध्ये सुधीर घाणेकर यांची “ऑस्करची गोष्ट” शॉर्टफिल्मचे सादरीकरण होणार आहे. सुधीर यांना त्यांच्या गावातील मंडळींनी नेहमीच मदत केली. तसेच मित्रमंडळी व परिवार यांचीही मोलाची साथ लाभली.


Tags: britainCinemaking International Film Festivalgood newsMotivationmuktpeethOscarratnagiriShort FilmSudhir GhanekarUK Lift of Film FestivalUkshiउक्षीऑस्करघडलं-बिघडलंचांगली बातमीप्रेरणाब्रिटनमुक्तपीठयुके लिफ्ट ऑफ फिल्म फेस्टिव्हलरत्नागिरीलघुपटसंघर्षगाधासिनेमेकिंग इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलसुधीर घाणेकर
Previous Post

‘एक दिवस तरी वारी अनुभवावी’ उपक्रमास उदंड प्रतिसाद, संविधान दिंडी पंढरपुरास रवाना!

Next Post

गौतम अदानींची उदारता! ६०व्या वाढदिवसानिमित्त समाजासाठी ६० हजार कोटी!

Next Post
gautam adani

गौतम अदानींची उदारता! ६०व्या वाढदिवसानिमित्त समाजासाठी ६० हजार कोटी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!