Wednesday, March 11, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महाराष्ट्रभर रेशन माफियांचा हैदोस…वाचा राज्यातील पाच टॉप रेशन चोरीच्या घटना!

छोटे मासे गळाला, रेशन माफिया मोकाटच!

September 18, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
ration mafia

मुक्तपीठ टीम

अकोल्यात महाराष्ट्रातील खामगावमधून तेलंगणात काळ्या बाजारात विकण्यासाठी जाणारा गहू जप्त करण्यात आल्यानंतर पुन्हा एकदा रेशन माफियांचा हैदोस उघड झाला आहे. गोरगरिबांच्या तोंडचा घास हिरावून घेणाऱ्या रेशन माफियांना काही राजकारणी आणि अधिकारी यांचा वरदहस्त असल्याशिवाय राज्यभर असे धान्य काळ्याबाजारात विकण्याचे गैरप्रकार घडणारच नाहीत, असा आरोप होत आहे. याआधीही अशा प्रकारे काळ्या बाजारात विकण्यासाठी नेले जाणारे गरिबांचे धान्य, अन्य वस्तू जप्त करण्याची कारवाई झाली आहे. पण दरवेळी कारवाई ही छोट्या माशांवर होत असल्याचा आरोप केला जातो. कारवाई एवढ्यांवर होत असेल तर पकडले न जाता बिनबोभाट काळाबाजार किती मोठ्या प्रमाणावर होत असेल, असाही प्रश्न विचारला जात आहे. मोठे रेशन माफिया तसेच मोकाट राहत असल्याने त्यांच्या कारवाया नव्याने सुरु राहतात, असे मानले जाते.

 

ताज्या घटनेत अकोल्यात गरिबांसाठी शासनाच्या सार्वजनिक धान्य वितरण यंत्रणेमार्फत देण्यात येणाऱ्या गव्हापैकी तब्बल ६०० क्विंटल गहू जप्त करण्यात आला आहे. हा गहू अकोल्याच्या खामगाव येथून हैदराबाद येथे काळ्या बाजारात विक्रीसाठी नेण्यात येत होता.

 

राज्यभर रेशन माफियांचा हैदोस

  1. जानेवारी महिन्यात सांगलीतील विटा येथे विटा येथे काळया बाजारात जाणारी धान्याची ३०० पोती जप्त करण्यात आली.
  2. जून महिन्यात हिंगोली जिल्ह्यात अकोला-वाशिम रस्त्यावर स्थानिक गुन्हा शाखेनं जप्त केला होता. त्या कारवाईत ४६० पोती गहू आणि १२ लाख रुपये किंमतीचा ट्रक असा एकूण १७ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला होता. याप्रकरणी ट्रकचालकासह अन्य एकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
  3. जुलै महिन्यात परभणीतील नवा मोंढा परिसरात दोन ट्रकसह ५०० पोती रेशनचा गहू जप्त करण्यात आला.
  4. ऑगस्ट महिन्यात अकोला जिल्ह्यातील हिवरखेडमध्ये ५२६ क्विंटल धान्य जप्त करण्यात आले. तेथील रमेश गुप्ताच्या गोदामात २५० क्विंटल रेशनचा गहू, २७६ क्विंटल रेशनचा तांदूळ, एक मोठा ट्रक, तीन मिनी ट्रक जप्त करण्यात आले.
  5. सप्टेंबर महिन्यात सोलापूर टेंभुणीमधील मोडलिंब मार्केट यार्डात काळ्या बाजारासाठी ट्रकमध्ये भरलेले आणि गोदामात लपवलेले रेशनचे साडे नऊ लाखाचा गहू आणि तांदूळ पोलिसांनी जप्त केला. आडत मालक सतीश माणिक सुर्वे, आणि ट्रक चालक, वाहकाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला.

Tags: 5 top theftsMaharashtrarationration mafiasरेशन माफिया
Previous Post

काळ्या बाजारासाठी गरिबांचा गहू नेणारे पकडले, पण पाठवणाऱ्या सुत्रधारांचं काय?

Next Post

‘आजी-माजी-भावी…’ मुख्यमंत्र्यांच्या मनात नेमकं दडलंय काय?

Next Post
shivsena- NCP

‘आजी-माजी-भावी...’ मुख्यमंत्र्यांच्या मनात नेमकं दडलंय काय?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!