Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

असं कसं झालं? मुंबई मनपा रुग्णालयात रुग्णाच्या डोळ्याखाली उंदराने कुरतडले!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
rajawadi hospital

मुक्तपीठ टीम

मुंबई मनपाच्या घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णाच्या डोळ्या खालचा भाग उंदराने कुरतडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रुग्णालयातील अतिदक्षता विभागात हा प्रकार घडला आहे. याप्रकरणामुळे अती दक्षता विभागातील दक्षतेचे वाभाडे निघाले आहेत. याप्रकाराबाबत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत महापौर किशोरी पेडणेकर यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत.

 

नेमकं प्रकरण काय?

  • राजावाडी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या श्रीनिवास यल्लपा या २४ वर्षीय रुग्णाच्या बाबतीत हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
  • दोन दिवसांपूर्वी त्याला राजावाडी पालिका रुग्णालयात दम लागत असल्याने दाखल केले होते.
  • तळमजल्यावर असलेल्या अतिदक्षता विभागात या रुग्णावर उपचार सुरू आहेत.
  • रुग्णाची प्रकृती आधीच नाजूक आहे तसेच तो बेशुद्धावस्थेत आहे.
  • असे असतानाच रुग्णाच्या डोळ्या खालचा भाग चक्क उंदराने कुरतडल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
  • श्रीनिवास याच्या डोळ्यांतून रक्त येत असल्याचे नातेवाईकांना दिसले. उंदराने त्याचे डोळे कुरतडल्याचा त्यांना संशय आला.
  • याबाबत त्यांनी रुग्णालयातील नर्सला सांगितले असता त्यांनी त्यांना उद्धट उत्तरे दिल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे.
  • त्यानंतर डॉक्टरांना याबाबत माहिती देण्यात आली असता त्यांनी तपासणीनंतर उंदराने डोळ्या खालच्या भागाचा उंदराने चावा घेतला असावा, असे दिसत असल्याचे सांगितले.
  • रुग्णालयाच्या अधिष्ठाता विद्या ठाकूर यांनीही उंदराने डोळ्या खालचा भाग कुडतडल्याचे सांगितले आहे.

 

महापौरांचे कारवाईचं आश्वासन!

  • राजावाडी रुग्णालयातील या धक्कादायक प्रकाराची गंभीर दखल महापौर किशोरी पेडणेकर यांनी घेतली आहे.
  • संबंधित रुग्णाच्या डोळ्याच्या पापण्या आणि आजूबाजूचा भाग उंदराने कुरतडल्याचे दिसत आहे.
  • “रुग्णाची परिस्थिती चांगली नाहीये.
  • हा प्रकार घडायला नको होता.
  • आम्ही यासंदर्भाच आवश्यक ती कारवाई करू”, असं महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं आहे.

डॉक्टरांनी काय म्हटलं?

  • दरम्यान, या सगळ्या प्रकारावर रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. विद्या ठाकूर यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे.
  • उंदराने डोळ्याचा खालचा भाग कुरतडला आहे.
  • त्याच्या डोळ्याला कोणतीही इजा झालेली नाही.
  • ज्या ठिकाणी हा प्रकार घडला, तो वॉर्ड ग्राउंड फ्लोअरला आहे.
  • लोक वारंवार सांगून देखील रुग्णालय परिसरामध्ये कचरा टाकत आहेत.
  • या कचऱ्यामुळेच कदाचित तिथे उंदीर आले असतील.

Tags: Mayor Kishori PednekarMy BMCडॉ. विद्या ठाकूरबृहन्मुंबई महानगरपालिकामहापौर किशोरी पेडणेकर
Previous Post

“अल्पसंख्याक समाजातील महिला बचतगटांना व्यवसायासाठी मिळणार २ लाख रुपयांपर्यंत कर्ज”

Next Post

ओबीसी आरक्षण रद्द झालेल्या ठिकाणी पोटनिवडणुका, ओबीसी नेते आक्रमक

Next Post
OBC reservation

ओबीसी आरक्षण रद्द झालेल्या ठिकाणी पोटनिवडणुका, ओबीसी नेते आक्रमक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!