शरयु इंदुलकर / चिपळूण
कोकणाला पुरानं झोडलं आणि महाराष्ट्रभरातून कोकणाकडे मदतीचा महापूर सुरु झाला. मग त्यात राष्ट्र सेवा दलाचा सेवाभाव कसा मागे असेल? पूर आल्याचं कळताच महाराष्ट्रातील राष्ट्र सेवा दलाच्या वेगवेगळ्या युनिट्सची पथकं मदतकार्यासाठी साधन आणि साहित्यासह कोकणात दाखल झाली. चिपळूणमधून शरयु इंदुलकर यांनी मांडलेला राष्ट्र सेवा दलाच्या मदत कार्याचा लेखाजोखा:
मुंबई राष्ट्र सेवा दलाचे शरद कदम, निसार अली आणि युवराज मोहिते हे पहिल्या दिवसापासून दोन कपड्यांवार इथे तळ ठोकून आहेत. मेडिकल कॅम्प लावणे, त्या टीम्सबरोबर सातत्याने घरोघरी फिरून आरोग्य सेवेबरोबर, उध्वस्त कुटुंबाच्या नुकसानाचा आढावा घेऊन आपल्या केंद्रातर्फे त्यांना प्रत्यक्ष मदत पोहोचेल याची काळजी घेणे, श्रमदानाला आलेल्या टीम्स कडून योग्य ठिकाणी श्रमदान करून घेणे, या संपूर्ण प्रक्रियेत आम्ही स्थानिक कार्यकर्ते योगदान देत आहोत.
मातृमंदिरचे कार्याध्यक्ष अभिजित हेगशेट्ये यांनी मातृमंदिर, देवरुख, स्थानिक सेवा दल आणि मुंबई, सेवा दल मिळून तातडीने हे मदत केंद्र सुरु करण्यात आणि नियोजनात पुढाकार घेतला आहे. मातृमंदिरचे कार्यवाह सतीश शिर्के दैनंदिन कामाच्या नोंदी ठेवणे आणि इतर कार्यालयीन कामाची जबाबदारी न थकता पार पाडीत आहेत. त्यांच्याबरोबर त्यांचे मदतनिस नवनाथ आणि दशरथ, हे दोघे केंद्रातील किट्स बनवणे, लोडिंग अनलोडिंगची व्यवस्था पहाणे अशा कामांचा भार उचलत आहेत. सोबतीला आडऱ्याची सानिका कदम शांतपणे सहकार्य करत आहे.
प्रकाश स. ग. केंद्रातील कामावर देखरेख ठेवण्याचं काम पहात आहे. निर्मला जमेल तेव्हा सवड काढून केंद्रात आणि मेडिकल कॅम्प्स मधे मदत करत आहे. अनिल काळे, राम सर ‘कमी तिथे आम्ही’ हे धोरण न थांबता राबवत आहेत. प्रा.ज्ञानोबा कदम मदत कार्यात सहभागी आहेत. चिपळूण राष्ट्र सेवा दलाचे मा. अध्यक्ष सकपाळ गुरुजी वय सांभाळून आणि राजन इंदुलकर घरात आलेल्या आपत्तीमुळे आपल्या परीने मार्गदर्शन करीत आहेत. जोगळेकर कुटुंबं हाकेसरशी किट्स वाटप करण्यासाठी स्वतःसह वाहन उपलब्ध करून देताहेत.
मुंबई आणि डेरवण इथल्या डॉक्टर्सनी मेडिकल कॅम्प्स मधील आणि घरोघरी जाऊन केलेलं चेकअप… worth saluting!!! रत्नागिरीची नवनिर्माणची टीम, मुंबईची सेवा दलाची टीम अशा इतर टीम्स तसेच मिरजहुन मगदूम सर आपल्या टीमसह तर दापोलीचे विकास घारपुरे व्यक्तिशः कर्तव्य समजून श्रमदानात सहभाग घेत आहेत. असंख्य volunteers सेवाभावीपणे पडेल ते श्रमदान करीत आहेत. लीना, शैलेश यांच्या सहकार्याने अनेक अडचणी दूर होत आहेत. डॉ. श्रुतिका आणि सुनिल कोतकुंडे, सुनिता आपापल्या पातळीवर कार्यरत आहेत. ऋजुता खरे स्वतः पूरग्रस्त आहे तरीही पहिल्याच दिवशी मदतीला आलेल्या रत्नागिरीच्या नवनिर्माण हायच्या टीम सोबत तिचा मोलाचा सहभाग होता. संतोष पुरोहितही या टीम मधे सामील झाले.
विशेष म्हणजे spm स्कूल चे माझे प्रिय माजी विद्यार्थी मला फोन करून करून मदतीची इच्छा व्यक्त करत आहेत. विशेषतः डॉक्टर आशिष बांदेकर, डॉक्टर वरुण देवधर, समृद्धी पवार, आदित्य घाग, सुमित शेट्ये, प्रणव कुलकर्णी, अमेय पाटील, सुश्मिता पाटील, किरण कुंभार, कार्तिक मंगळवेढे, ओंकार पवार, हर्ष पटेल , सपना कोळवणकर अमृता आणि शर्वरी जाधव, माझी मुलगी रेणू, तिचे GIT चे विध्यार्थी या माझ्या विद्यार्थ्यांनी माझ्या आवाहनाला मदत रूपात प्रेमळ प्रतिसाद दिलाय.
आणि.. मीडियातील माझा जुना विद्यार्थी मुजीब दळवीचे विशेष प्रयत्न तर लॉन्ग टर्म ठरणार आहेत. त्यासाठीची त्याची गेले आठ दिवसांची धावपळ ही खरंच उंटावरून शेळ्या हाकण्यासारखी नाही हे येणाऱ्या काही दिवसांतच दिसून येईल. त्याच्याबद्दल सवडीने लिहिणार आहे. जाफर भाई गोठे आणि नवी सोबती शिल्पा रेडीज काल परवाच सोबत आले आहेत.
हा समारोप नाही. अजून खूप चालायचं आहे. आमच्या पातळीवर काम थांबल्यावर लिहिणार म्हटलं तर खूप काळ थांबावं लागेल …. अजूनही माणसं जोडून घ्यायची असतील तर हे आत्ताच लिहायला हवं एवढ्याचसाठी…… मला अभिमान आहे या सगळ्यांचा… माझ्या मैत्रिणी सुषमा आणि रेखा यांचं इथे नसणं सतत जाणवतंय.. आपण सर्वजण एकमेकांच्या सोबतीने खूप काही करु शकतो. करत राहुया. एकमेकांच्या हातात हात घालून आपण चालत राहुया. साथी हाथ बढाना म्हणत मदतीचा हात देऊया!!