Thursday, May 8, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

रणवीर सिंहची वांद्रे समुद्र किनारी आलिशान घर खरेदी! घराच्या फक्त स्टँप ड्युटीत येतील मुंबईत सात फ्लॅट्स!!

July 12, 2022
in featured, घडलं-बिघडलं, मस्तच
0
Ranveer Singh

मुक्तपीठ टीम

अभिनेता रणवीर सिंहने देशातील सर्वात मोठ्या निवासी अपार्टमेंट डीलमध्ये वांद्र्याच्या उपनगरात ११९ कोटी रुपयांना एक आलिशान फ्लॅट खरेदी केला आहे. रणवीरच्या या नवीन घरातून समुद्राचे अतिशय सुंदर मनमोहक दृश्य पाहायला मिळते. अभिनेत्याने शाहरुख खानचा बंगला ‘मन्नत’ आणि सलमान खानचा ‘गॅलेक्सी अपार्टमेंट’ यांच्या मधली बँडस्टँडमधील ‘सागर रेशम’ या इमारतीचा १६वा, १७वा, १८वा आणि १९वा मजला विकत घेतला आहे.

ओह फाइव्ह ओह मीडिया वर्क्स एलएलपी कंपनीचे संचालक म्हणून सिंह आणि त्यांचे वडील जुगजीत भवनानी सिंह यांनी पुनर्बांधणीचे काम सुरू असलेल्या इमारतीत एक अपार्टमेंट विकत घेतले आहे. अभिनेत्याच्या पसंतीनुसार बिल्डर चार मजली बांधकाम करेल, असे या करारात मान्य झाल्याचे सूत्रांनी सांगितले. सिंह यांच्या प्रतिनिधींना पाठवलेल्या प्रश्नांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

सूत्रांनी सांगितले की, व्यवहारासाठी ७ कोटी रुपयांपेक्षा जास्त मुद्रांक शुल्क भरण्यात आले आहे, ज्यामध्ये ११ हजार २६६ चौरस फूट जागा, एक विशेष १ हजार ३०० चौरस फूट टेरेस आणि १९ पार्किंग लॉटचा समावेश आहे. प्रति चौरस फूट किंमत सुमारे एक लाख रुपये आहे. रणवीर आणि दीपिका पदुकोण यांचे हे क्वाड्रप्लेक्स मुख्य घर असण्याची शक्यता आहे.

रणवीर आणि दीपिका जवळजवळ तीन वर्षांपासून जुहू आणि वांद्रे भागात एक स्वतंत्र बंगला शोधत होते, जेथे अनेक सेलिब्रिटी राहतात. गेल्या वर्षी या जोडप्याने २२ कोटी रुपयांना अलिबागमध्ये दुसरे घर विकत घेतले. सध्या ‘सागर रेशम’मध्ये एवढी मोठी नावे नाहीत जी या स्टार जोडीचे शेजारी असतील. रिअल इस्टेट कन्सल्टन्सी फर्म जेएलएल इंडियाच्या निवासी सेवांचे वरिष्ठ संचालक आणि प्रमुख रितेश मेहता यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, अभिनेत्याने दिलेली रक्कम बाजाराच्या ट्रेंडनुसार आहे. या ठिकाणी मालमत्तेची किंमत ९० हजार रुपये ते १.१० लाख रुपये प्रति चौरस फूट आहे.


Tags: BandraBeach HouseFlat Stamp DutyLuxury Home PurchasemuktpeethmumbaiRanveer singhआलिशान घर खरेदीघडलं-बिघडलंफ्लॅट स्टँप ड्युटीमस्तचमुक्तपीठमुंबईरणवीर सिंहवांद्रेसमुद्र किनारी घर
Previous Post

भाजपासोबत होती ज्यांची युती…त्यासर्वांची झाली पुढे माती!

Next Post

प्रा. हरी नरके यांना यंदाचा कॉ. गोविंद पानसरे प्रबोधन पुरस्कार जाहीर

Next Post
Prof Hari Narke will recives co. Govind Pansare Prabodhan Award this year

प्रा. हरी नरके यांना यंदाचा कॉ. गोविंद पानसरे प्रबोधन पुरस्कार जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!