Saturday, May 10, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home घडलं-बिघडलं

अनिल परबांवर वाझेंच्या आरोपांनंतर भाजपा, मनसेकडून टोलेबाजी

April 8, 2021
in घडलं-बिघडलं
0
nitesh rane

मुक्तपीठ टीम

परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांच्यावर सचिन वाझेंनी गंभीर आरोप केल्यानंतर त्यांच्या राजकीय विरोधकांनी स्वाभाविकच टोलेबाजीला सुरुवात केली आहे. भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत निशाणा साधला आहे. आता मानहानीची नोटीस कोण पाठवणार? असा खोचक प्रश्न नितेश राणे यांनी ट्विट करत विचारला आहे. मनसेही याबाबतीत मागे राहणे शक्यच नव्हते. मनसे नेते संदीप देशपांडे यांनीही ट्विट करत शपथेवरून टोला लगावला आहे.

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विश्वासातील नेते म्हणून अॅड. अनिल परब ओळखले जातात. त्यामुळेच विधानपरिषदेवर असूनही अपवाद करुन सुभाष देसाईंसोबत त्यांनाही कॅबिनेट मंत्रीपदाची संधी देण्यात आली. शिवसेनेसाठी आवश्यक असणाऱ्या अनेक गोपनीय कामगिऱ्यांची जबाबदारी ठाकरेंकडून त्यांच्यावरच सोपवण्यात येते. त्यामुळे ते कायम शिवसेना आणि त्यातही ठाकरेविरोधकांच्या नजरेत असतात. मनसेचे नगरसेवक कायदेशीररीत्या फोडून शिवसेनेचे संख्याबळ वाढवण्याचे संपूर्ण ऑपरेशन त्यांनीच पार पाडले होते. त्यामुळे मनसेचाही त्यांच्यावर राग आहे.

 

आमदार नितेश राणे यांनी केलेले ट्विट बोलके आहे. यात म्हटले आहे की “मी विचार करत होतो मला शहरातली सर्वात एलिजिबल आणि उच्चशिक्षित बॅचलरकडून अजूनही मानहानीची नोटीस येणार का? आतुरतेने वाट पाहतोय. वकील साहेबांची तर काल लागली… आता नोटीस कोण बनवणार?”

 

I was wondering..
Am I still goin to get a defamation notice from the most eligible n highly educated bachelor in town ?
Eagerly waiting..
Vakil sahab ki toh kal lag gayi..ab notice kon banayega?

— nitesh rane (@NiteshNRane) April 8, 2021

 

नितेश राणेंनी कालही ट्विटरवरुन निशाणा साधला होता. “ओ परिवार मंत्री.. शपथ काय घेता.. शेंबूड पुसा.. राजीनामा द्या आणि चौकशीला सामोरे जा.. पुरावे तयार आहेत.. आता वस्त्रहरण अटळ आहे!!” असे ट्वीट नितेश राणेंनी केले होते.

 

ओ परिवार मंत्री..
शपथ काय घेता..
शेंबूड पुसा..
राजीनामा दया आणि चौकशी ला सामोरे जा..
पुरावे तयार आहेत..
आता वस्त्रहरण अटळ आहे!!

— nitesh rane (@NiteshNRane) April 7, 2021

 

मनसे नते संदिप देशपांडे यांचीही टीका

मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर निशाणा साधला आहे. संदीप देशपांडे यांनी ट्विट करत म्हटले आहे की, “Master Stroke to Master mind हा प्रवास थक्क करणारा आहे” “Advocate साहेब शपथेवर खोट बोलणं हा गुन्हा आहे हे आपल्याला माहित असेल ही अपेक्षा’ असे सणसणीत टोला ट्विटद्वारे संदीप देशपांडे यांनी लगावला आहे.

 

Master Stroke to Master mind हा प्रवास थक्क करणारा आहे” Advocate”साहेब शपथेवर खोट बोलणं हा गुन्हा आहे हे आपल्याला माहित असेल ही अपेक्षा

— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) April 8, 2021

 

अनिल परब यांच्यावर आरोप काय केलेत?

  • निलंबित पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांनी एनआयए कोर्टात एक पत्र देऊन परब यांच्यावर खळबळजनक आरोप केला आहे.
  • “अनिल परब यांनी आपल्याला जुलै-ऑगस्ट २०२० मध्ये बोलावून घेतलं होतं.
  • एसबीयुटी प्रकल्पाच्या ट्रस्टींकडून ५० लाख रुपये मागितले.
  • या एसबीयूटीची चौकशी सुरू होती. आधी त्यांनी मला या एसबीयूटी प्रकरणाची चौकशी करून ट्रस्टींसोबत चर्चा करायला सांगितलं होतं.
  • नंतर केस बंद करण्याच्या नावाखाली एसबीयूटीकडून ५० लाख रुपये वसूल करण्यास सांगितले.
  • त्याला मी नकार दिला. कारण एसबीयूटीमध्ये मी कुणालाच ओळखत नव्हतो.
  • मुंबई मनपाच्या काळ्यायादीतील ठेकेंदारांकडून वसुली करण्यास सांगितले.

Tags: अनिल परबनितेश राणेशिवसेनासंदिप देशपांडेसुभाष देसाई
Previous Post

#अध्यात्म आपले भाग्य आपल्या हाती

Next Post

काश्मिरी दहशतवाद्यांना बिहारमधून शस्त्रे!

Next Post
munger weapons

काश्मिरी दहशतवाद्यांना बिहारमधून शस्त्रे!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!