Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

काश्मिरी दहशतवाद्यांना बिहारमधून शस्त्रे!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
munger weapons

मुक्तपीठ टीम

देशभरात बेकायदा शस्त्र पुरवठ्यासाठी बिहारकडे पाहिले जाते. त्यातही बिहारमधील काही जिल्ह्यांमध्ये बेकायदा शस्त्रनिर्मितीचे गृहउद्योगच चालतात, असे म्हटले जाते. अवैध शस्त्रे बनवून पुरवठा करण्यासाठी मुंगेर, लखीसराय, खगडिया, दियारा परिसर कुख्यात आहे. आता गुप्तचर यंत्रणांना मिळालेली माहिती धक्कादायक आहे. काश्मिरातील दहशतवाद्यांची सीमेवर नाकाबंदी झाल्यानंतर त्यांनी बिहारमधील शस्त्र माफियांशी संधान साधले आहेत. गुप्तचर सेवांनी दिलेल्या माहितीच्या आधारे बिहार पोलिसांनी काश्मिरी दहशतवाद्यांना शस्त्रपुरवठा करण्याच्या आरोपाखाली जावेद आलम अन्सारीला अटक केली आहे.

मुंगेरची ही बेकायदा शस्त्रे आता काश्मिरी दहशतवाद्यांपर्यंत सहज पोहोचू लागली आहेत. काश्मीर खोऱ्यात फुटीरतावादी दहशतवाद्यांविरोधातील कारवाईनंतर सैन्याला बिहार कनेक्शन असलेली बेकायदा शस्त्रे मिळत आहेत. गेल्या काही महिन्यांत मुंगेरी शस्त्रास्त्रांच्या अनेक वस्तूंचा मोठ्या प्रमाणात पुरवठा काश्मिरी दहशतवाद्यांना करण्यात आल्याचे आता उघड होत आहे.

काश्मिरमधील लष्कर-ए-मुस्तफाचा कमांडर हिदायत उल्लाह मल्लिक याला मुंगेरहून अवैध शस्त्रे पुरविण्यात आल्याचे गुप्तचर संस्थांना कळले. केंद्रीय अन्वेषण यंत्रणांच्या माहितीच्या आधारे बिहार एसटीएफने त्याला अटक केली. या संपूर्ण प्रकरणात जावेदची सखोल चौकशी आणि केंद्रीय यंत्रणांच्या चौकशी अहवालात अनेक खळबळजनक घटना उघडकीस आल्या आहेत.

मुंगेर येथून अवैध शस्त्रे बनवणारे काही कारागीरही काश्मीरमध्ये गेले आणि तेथील फुटीरवाद्यांसाठी त्यांनी बेकायदा शस्त्रे बनवली, अशी माहितीही मिळाली आहे. केंद्रीय अन्वेषण यंत्रणांनीही अशा अवैध धंद्यात अडकलेल्या किंवा बाहेर जाऊन शस्त्रे बनविणारे काही अवैध व्यापारी शोधले आहेत. सध्या त्यांचा शोध वेगात सुरू आहे. त्याच्या अटकेनंतर त्यांनी कुठे आणि कोणासाठी शस्त्रे तयार केली आहेत याबाबत माहिती मिळू शकेल.

 

असा बदलतोय बेकायदा शस्त्रास्त्रांचा ट्रेंड…

  • गेल्या काही महिन्यांपासून या भागातील एसटीएफ आणि स्थानिक पोलिसांकडून सुरू असलेल्या बेमुदत छापा आणि तस्करांवर व्यापक कारवाईमुळे येथील अवैध व्यावसायिक आणि तस्करांचे कंबरडे मोडले.
  • पण त्यांनी धंदा बंद केला नाही. फक्त पद्धत बदलली.
  • त्यांनी आता आपल्या बेकायदेशीर व्यवसायाचे विकेंद्रीकरण केले आहे.
  • हे व्यापारी ज्या ठिकाणी ऑर्डर मिळतात त्याच ठिकाणी जाऊन अवैध शस्त्रे बनवतात.
  • ते यापुढे त्यांच्या घरी किंवा लपण्याच्या ठिकाणी बेकायदेशीर शस्त्रे बनविण्याचा धोका घेत नाहीत.

 

शस्त्रांसाठी बिहारकडे का वळले दहशतवादी?

  • भारताने काश्मीरमधील पाकिस्तान सीमा सिल केल्या आहेत.
  • तेथे बरीच दक्षता वाढविण्यात आली आहे.
  • तारांच्या घनदाट वेटोळ्यांबरोबरच सीमेवर नाईट-व्हिजनसह अनेक आधुनिक देखरेख यंत्रणा बसविण्यात आल्या आहेत. यामुळे, सीमेवरून शस्त्रांची तस्करी मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.
  • नेपाळ आणि बांगलादेशच्या सीमेवर दक्षता वाढल्याने तेथून होणारी शस्त्रास्त्रांची तस्करी मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.
  • त्यामुळेच दहशतवादी मुंगेरच्या बेकायदा शस्त्रास्त्रांचा वापर करत आहेत.
  • बिहारी धंदेवाले काश्मिरात किंवा ज्यांना शस्त्रे पाहिजे तेथे जाऊन कारागिरांकडून शस्त्रे बनवतात, तर बिहारच्या काही लोकांना बोलवून त्यांना आयडी बनवण्याच्या पद्धतीही शिकवल्या आहेत अशी माहितीही मिळू लागली आहे.

Tags: फुटीरतावादीबिहारमुंगेरशस्त्रेहिदायत उल्लाह मल्लिक
Previous Post

अनिल परबांवर वाझेंच्या आरोपांनंतर भाजपा, मनसेकडून टोलेबाजी

Next Post

डोळ्यांवरचे मास्क काढा! मतांसाठी तरी मतदार वाचवा! प्रचाराविना निवडणुका लढवा!

Next Post
Mask on Eyes

डोळ्यांवरचे मास्क काढा! मतांसाठी तरी मतदार वाचवा! प्रचाराविना निवडणुका लढवा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!