Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

रिपब्लिकन पार्टीचे गरिबी हटाव! भूमिहीनांना जमिनीसाठी आंदोलन करणार!!

February 10, 2021
in घडलं-बिघडलं
0
ramdas athvle

मुक्तपीठ टीम

गरिबी चे प्रमाण कमी करण्यासाठी गरिब भूमिहीनांना ५ एकर जमीन द्यावी या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षातर्फे येत्या २५ फेब्रुवारी रोजी देशव्यापी भूमीमुक्ती आंदोलन करण्याची घोषणा आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली.

 

नवी दिल्लीत नवीन महाराष्ट्र सदन येथे रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आज झाली त्यात रामदास आठवले यांनी ही घोषणा केली.

 

या बैठकीत आगामी ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुका लढण्याबाबतची रणनीती ठरविण्यात आली.

 

पश्चिम बंगाल मध्ये भाजपला विजयी करण्याचा आणि ममता बॅनर्जी यांचे सरकार घालविण्याचा आपण निर्धार केला आहे. त्यामुळे पश्चिम बंगाल मध्ये भाजप सोबत आरपीआयची युती कारण्याबाबतचा निर्णय रिपाइंने घेतला आहे. केरळ, पाश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू आणि जम्मू काश्मीर या ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजप सोबत युती करण्याबाबत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेणार असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले. भाजपशी युती करताना भाजपने काही जागा आरपीआयला सोडाव्यात तसेच ज्या राज्यात आरपीआय ला जागा सोडणार नाही त्या राज्यात काही जागा आरपीआयतर्फे स्वबळावर लढविण्यात येतील व उरलेल्या जागांवर भाजपला पाठिंबा देण्यात येईल असे ना रामदास आठवले यांनी जाहीर केले.

 

नवीन कृषी कायदे हे शेतकऱ्यांचे हिताचे कायदे असून या कायद्यांचे स्वागत करीत असल्याचा ठराव रिपाइंच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत
आज संमत झाला. कोरोनाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन लावून भारतीयांचे जीव वाचविले.गरिबांना मोठी मदत केली त्याबद्दल रिपाइंच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करणारा ठराव संमत झाला असल्याची माहिती ना रामदास आठवले यांनी केली. या बैठकीत रामदास आठवले यांच्या पत्नी सौ सीमाताई आठवले, रिपाइं चे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, एम. वेंकटस्वामी, एम डी शेवाळे, काकासाहेब खंबाळकर, राजीव मेनन, सैफी, दयाळ बहादूरे, फादर सुसाई, विनोद निकाळजे, मृत्युंजय मलिक, नुसरत जहा, अनिल बाबा, पवन गुप्ता, हितेश देवरी, शशी कुमार, ऍड. ए पी शिबी, सुनील मोरे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.


Tags: BJPMamata Banerjeeramdas athwaleRepublican partyRPIभाजपममता बॅनर्जीरामदास आठवले
Previous Post

संसदेत बोलताना पंतप्रधान मोदी झाले भावूक…डोळ्यात अश्रू!

Next Post

मातृभाषेतून शिक्षण देणाऱ्या अभियांत्रिकी, वैद्यकीय संस्थेच्या उभारणीसाठी महाराष्ट्राने पुढाकार घ्यावा

Next Post
shelar

मातृभाषेतून शिक्षण देणाऱ्या अभियांत्रिकी, वैद्यकीय संस्थेच्या उभारणीसाठी महाराष्ट्राने पुढाकार घ्यावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!