मुक्तपीठ टीम
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राजकारणात आता उभारी घेतील असं वाटत नाही. मोदींसोबत शिंदे असणार आहेत. येत्या काळात आणखी तीन खासदार शिंदे गटात येतील. ठाकरे नसले तरी शिंदे आहेत.शिंदेंच्या जास्तीत जास्त जागा येतील आणि उद्धव ठाकरे क्षीण क्षीण होत जाती, अशी टीका रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली आहे. ते पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते.
खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेंची!!
- एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे पुन्हा उभारी घेतील असे वाटते का, असा प्रश्न रामदास आठवले यांना विचारण्यात आला.
- त्यावर आठवले यांनी म्हटले की, येणाऱ्या काळात उद्धव ठाकरे उभारी घेतील असं वाटत नाही.
- एकनाथ शिंदे मूळ शिवसेनेत हे होते.
- ज्यांच्याकडे बहुमत त्यांच्याकडे खरी शिवसेना असेल.
- सध्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४० आमदार आणि १२ खासदार आहे.
- आणखी तीन खासदार हे शिंदे यांच्यासोबत जाणार आहेत.
- त्यामुळे खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची आहे.
- निवडणूक आयोगाकडून एकनाथ शिंदे यांना नक्की न्याय मिळेल. धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे गटालाच मिळेल.
- तसे राज्यात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल.
- राष्ट्रपतीपदाच्या शपथविधीनंतर राज्याला नवे मंत्रिमंडळ मिळेल.
शिंदेंच्यारुपाने खरी शिवसेना ही पंतप्रधान मोदींसोबत!!
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आता एकनाथ शिंदे असणार आहेत.
- तसेच २०२४ मध्ये पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी हे पुन्हा सत्तेत येणार आहेत.
- लोकसभा निवडणुकीत भाजपाप्रणित एनडीएचे ४०० पेक्षा अधिक खासदार हे निवडून येतील.
- अशावेळी उद्धव ठाकरे नसले तरी शिंदे यांच्यारुपाने खरी शिवसेना ही पंतप्रधान मोदींसोबत असेल.