Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आता रामदास आठवलेही बोलले, “विरोधकांना त्रास देणारं आघाडी सरकार बरखास्त करा!”

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Ramdas Athwale

मुक्तपीठ टीम

फोन टॅपिंग आणि पोलीस बदल प्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा पोलिसांनी नोंदवलेला जबाब तर दुसरीकडे मुंबई बँकेच्या बोगस मजुरप्रकरणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांविरोधात नोंदवलेला गुन्हा यामुळे भाजपा आक्रमक झाली आहे. सरकारच्या भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवत असल्याने राज्य सरकार विरोधकांचा आवाज दाबण्याचे काम करत आहे, असा आरोप भाजपाने केला आहे. याच पार्श्वभूमीवर आता भाजपाच्या मदतीला भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आले आहेत. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिणार असून लवकरच त्यांची भेट घेणार असल्याचंही आठवले यांनी सांगितलं.

 

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू व्हावी…

  • मी अमित शाहांना एक पत्र लिहिणार आहे.
  • त्यांना भेटणारही आहे.
  • महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणार आहे.
  • विरोधकांना सातत्याने त्रास दिला जाणार असेल तर हे सरकार बरखास्त केलं पाहिजे.
  • सरकार बरखास्त करण्याची वेळ नक्की येईल.
  • त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू व्हावी.

 

राष्ट्रपती राजवट म्हणजे काय?

  • राज्य सरकारने घटनाबाह्य काम केलं, सरकारकडे बहुमत राहिलं नाही, राज्यातील कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती ढासळली, निवडणुकांच्या निकालात कोणत्याही पक्षाला किंवा आघाडीला स्पष्ट बहुमत मिळालं नाही, सरकार स्थापनेसाठी कोणताही पक्ष पुढे आला नाही, एखाद्या गटाने बंड केलं किंवा सरकारमधील दोन पक्षांची आघाडी संपुष्टात येऊन सरकार अल्पमतात गेलं, तर राष्ट्रपती राजवट लागू होते.
  • घटनेच्या ३५६ व्या कलमानुसार राष्ट्रपती राजवट लागू केली जाते.
  • ही राष्ट्रपती राजवट २ महिन्यांच्या काळापुरती राहू शकते.
  • या काळापुरती विधानसभा स्थगित होते.
  • या कालावधीत राज्यपाल हे राज्याचे मुख्य सचिव आणि काही सनदी अधिकाऱ्यांच्या मदतीने राज्याचा कारभार पहातात.
  • या कालावधीत निर्णय घेण्याचे अधिकार संसदेकडे जातात.

Tags: BJPMVApresidential ruleramdas athwaleअमित शाहाभाजपामहाराष्ट्रमहाविकास आघाडी सरकाररामदास आठवलेराष्ट्रपती राजवट
Previous Post

शाळा-कॉलेजभोवती ‘या’ कारणामुळे पिवळी लष्मणरेखा सक्तीची!

Next Post

अवयवदान वाढण्यासाठी आता कृती आराखडा!

Next Post
Rajesh Tope

अवयवदान वाढण्यासाठी आता कृती आराखडा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!