मुक्तपीठ टीम
आगामी नवी मुंबई, वसई विरार, कल्याण डोंबिवली आदी मनपा निवडणुका तसेच पुढील वर्षी होत असलेल्या मुंबई महापालिका आणि जिल्हा परिषद सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप आरपीआय युती बाबत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भेट घेऊन चर्चा केली. यावेळी भाजप आणि आरपीआयचे विभाग निहाय संयुक्त मेळावे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशचे राज्यव्यापी अधिवेशन येत्या २१ मे रोजी जळगाव येथे आयोजित करण्यात आले आहे. रिपाइं तर्फे देवेंद्र फडणवीस यांना प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.
कोणत्या विषयांवर चर्चा
- आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांना कमळ चिन्ह देण्यात यावे याबाबत चर्चा करण्यात आली.
- सांगली आणि पुणे येथे रिपाइंला उपमहापौर पद देण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.
- केंद्र सरकारच्या विविध समिती महामंडळामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्याना पद देण्याबाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी रिपाइंचे राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खंबालकर, मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे, सुरेश बारशिंग, चंद्रशेखर कांबळे, परशुराम वाडेकर, बाळासाहेब जानराव, संजय सोनवणे, आदी रिपाइंचे पदाधिकारी उपस्थित होते.