मुक्तपीठ टीम
अयोध्येमध्ये राम मंदिराचं निर्माण कार्य वेगानं सुरू आहे. सध्या मंदिराच्या पायाभरणीचं काम सुरू आहे. वास्तू मजबूत व्हावी, यासाठी तब्बल पाया हा ४४ थरांचा असणार आहे. तौक्ते आणि यास वादळादरम्यान झालेल्या पावसामुळे काही दिवस काम बंद होते. सोमवारपासून हे काम पुन्हा सुरू झाले आहे.
श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय कामकाज पाहण्यासाठी मंदिर परिसरात आले होते. यावेळी त्यांनी सांगितले की, मंदिराच्या पायाचे काम येत्या ऑगस्टपर्यंत पूर्ण केले जाईल.
महामंदिराचा पायाही महामजबुत!
- १.२० लाख चौरस फुटांमध्ये बांधला जातोय पाया
- ४०० फूट लांब आणि ३०० फूट रुंद आकारमानामध्ये या पायाचे काम सुरू आहे.
- पायाबांधणीसाठी ४४ थर रचले जाणार आहेत.
- प्रत्येक थराची जाडी १२ इंच असेल.
- रोलर दाबल्यानंतर ते कमी होऊन १० इंच होईल.
- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राम मंदिरासाठी समुद्र सपाटीपासून १०५ मीटर उंचीवर भूमीपूजन केले होते.
- आता त्या ठिकाणावरुन ढिगारा हटवण्यात आला आहे.
- त्यामुळे मंदिराची उंची समुद्र सपाटीपासून ९३ मीटर वर असेल.
पायातून निघालेल्या मातीला प्रसादाचा मान
- अयोध्येत राम मंदिराच्या खोदकामातून निघालेल्या मातीला घरोघरी पोहचवण्याचे काम सुरू करण्यात आले होते.
- दररोज रामाच्या दर्शनासाठी येणारे भाविक येथील माती आपल्यासोबत घरी घेऊन जात होते.
- पण, कोरोनामुळे मागील काही दिवसांपासून हे बंद आहे.
श्री रामजन्मभूमि परिसर में नींव के लिए लगातार चली खुदाई के बाद विशेषज्ञों की सलाह से यह निर्णय किया गया कि नींव भराई का कार्य Roller Compacted Concrete तकनीक से किया जाएगा। लगभग 1,20,000 स्क्वायर फ़ीट क्षेत्र में अभी 4 परत बिछाई जा चुकी हैं। कुल 40-45 ऐसी ही परत बिछाई जाएंगी। pic.twitter.com/BcG2CpiHoA
— Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra (@ShriRamTeerth) May 31, 2021