मुक्तपीठ टीम
गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला मालकीची अकासा एअरलाईन या खासगी विमान कंपनीच्या पहिल्या व्यावसायिक उड्डाणाचे नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी रविवारी उद्घाटन केले. अकासा एअरलाइनचे पहिले फ्लाइट मुंबईहून रविवारी सकाळी १०.०५ वाजता निघाले आणि अहमदाबादला सकाळी ११.२५ वाजता पोहोचले. सिंधिया यांनी अकासा एकर केवळ मार्केट शेअरमध्येच नव्हे तर ग्राहक सेवा आणि ग्राहक कायद्याच्या बाबतीतही महत्त्वाची भूमिका बजावेल, असे सांगितले.
अकासा एअर चे उड्डाण कुठे?
- आकासा एअरची पहिली विमानसेवा मुंबई-अहमदाबाद मार्गावर उपलब्ध झाली आहे.
- काही दिवसांपूर्वी कंपनीकडून सांगण्यात आले होते की, आकासा एअर हळूहळू त्यांच्या फ्लाइट्सची संख्या वाढवेल.
- अकासा एअरने काही नवीन मार्गांवर हवाई प्रवास सुरू करण्याबाबत माहिती शेअर केली आहे.
- नवीन मार्गावरील प्रवासासाठी फ्लाइटचे बुकिंग आधीच सुरू झाले आहे.
- अकासा एअरलाइनच्या म्हणण्यानुसार, कंपनी वेगाने आपले नेटवर्क वाढवेल.
- तसेच, लवकरच अधिकाधिक शहरांमधून आपली सेवा सुरू करणार आहे.
HMCA Shri @JM_Scindia, HMoSCA Shri @Gen_VKSingh, Shri Rajiv Bansal, Secretary-MoCA, Smt. @ushapadhee1996, JS-MoCA, Smt. Neelu Khatri, Co-founder & Sr.VP corporate affairs, flagged off the first flight of @AkasaAir from @CSMIA_Official to @ahmairport.#AkasaAir pic.twitter.com/5XjPU4rBtZ
— MoCA_GoI (@MoCA_GoI) August 7, 2022
आकासा एअरचे पहिले उड्डाण
- मुंबई-अहमदाबाद मार्गावर सुरू झालेले हे उड्डाण अकासा एअरचे पहिले उड्डाण आहे.
- अकासा एअरच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, अहमदाबाद-मुंबईसाठी एका प्रवाशासाठी एकतर्फी भाडे ५६०३ रुपये ठेवण्यात आले आहे.
- हे भाडे ७ ते १७ ऑगस्ट दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आहे.
- ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या उर्वरित दिवसांसाठी प्रवाशांना २ हजार ८४८ रुपये भाडे मोजावे लागणार आहे.
- दुसरीकडे, ७ ते १७ ऑगस्ट दरम्यान मुंबई ते अहमदाबाद प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रति तिकीट भाडे ५ हजार ६४५ रुपये आकारले जाणार आहेत.
- ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या उर्वरित दिवसांसाठी भाडे कमी असेल.
- वेबसाइटवर भाडे २ हजार ९९८ रुपये असल्याचे दिसते.
- या मार्गावरील उड्डाणे ७ ऑगस्टपासून म्हणजेच आजपासून सुरू झाली आहेत.
- अकासा एअर मुंबई ते अहमदाबाद दरम्यान आठवड्यात २६ उड्डाणे चालवेल.
Presenting a new airline to India 🇮🇳 @AkasaAir
Live inauguration: https://t.co/dv8pWJ24pT
— Jyotiraditya M. Scindia (@JM_Scindia) August 7, 2022
बंगळुरू-कोची मार्गाबद्दल
- बंगळुरू-कोची मार्गावरील फ्लाइट्स १२ ऑगस्ट २०२२ पासून सुरू होणार आहे.
- बंगळुरू-कोची मार्गावरील एकेरी भाडे १२ ऑगस्ट रोजी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ४३७५ रुपयांपासून सुरू होते.
- त्याच वेळी, १३ ऑगस्टच्या प्रवासासाठी, प्रवाशाला ३९०३ रुपये मोजावे लागतील.
- १४-१७ ऑगस्ट दरम्यान प्रवास करणाऱ्यांसाठी भाडे ३६९३ रुपयांपासून सुरू होईल.
- कोची-बंगळुरू एकेरी भाड्यासाठी प्रवाशांना १२ ते १७ ऑगस्ट दरम्यान ३४९२ रुपये मोजावे लागतील.
- जर तुम्ही ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या इतर दिवशी प्रवास केला तर कंपनीकडून एका व्यक्तीसाठी २४८५ रुपये भाडे असेल.
बंगळुरू-मुंबई मार्ग
- जर तुम्ही बंगळुरू-मुंबई दरम्यान अकासा एअरने प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी दर आठवड्याला २८ फ्लाइट उपलब्ध असतील.
- अकासा एअर १९ ऑगस्टपासून बंगळुरू-मुंबई मार्गावर उड्डाण सुरू करणार आहे.
- बंगळुरू ते मुंबई एकेरी भाडे ४५१५ रुपयांपासून सुरू होईल.
- त्याचबरोबर मुंबई ते बंगळुरूचे एकेरी भाडे ३८३९ रुपये आहे.