Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकरी हिताचे पोकळ दावे, स्वाभिमानीची टीका

February 2, 2021
in घडलं-बिघडलं
0
raju shetti

मुक्तपीठ टीम

 

केंद्रीय अर्थंसंकल्पात पोकळ दावे आणि दाव्यांचे बुडबुडे याच्याशिवाय यामध्ये काहीच नाही, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे.

 

राजू शेट्टी यांची अर्थसंकल्पावरील प्रतिक्रिया त्यांच्याच शब्दात:

 

लॉकडाऊनच्या काळामध्ये देशाची अर्थव्यवस्था घसरलेली होती. आणि शेष नागाने पृथ्वीला सावरलेले होते, त्यापध्दतीने कृषिक्षेत्राने टेकू दिला. अर्थव्यवस्था स्थिरस्थावर होण्याच्या दृष्टीने दिशा मिळाली. मात्र कृषि क्षेत्राला काय मिळाले? केवळ दावेच. १६ लाख कोटींची कृषि कर्जाची तरतूद केली आहे. ही तर पहिल्यापासूनच आहे. यात नवीन काही नाही. शेतकर्‍यांना खताची सबसिडी मिळत नाही. उत्पादन खर्च वाढत चाललेला आहे. डिझेलच्या किंमती वाढत चाललेल्या आहेत. डिझेलवर लावलेल्या अधिभाराच्या पैशाचे काय करणार? त्याचा काहीच उल्लेख नाही.

 

साठवणूक व्यवस्था, शीतगृहा करिता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले होते. त्याचं काय झाले? ७५ हजार कोटीची गहू खरेदी तरतूद केली आहे. ही तर पुर्वी पासूनच आहे. तुलनाच करायची असेल तर मनमोहन सिंग सरकारमध्ये किती हमीभाव होता व आता किती आहे. त्यांची खरेदी किती होती व आमची किती आहे. मनमोहन सिंग सरकारच्या काळामध्ये डिझेल, रासायनिक खते, मजुरी, वीज बिल, बियाणे, किटनाशके आदींचे भाव काय होते. आता काय आहेत, याची तुलना करा.

 

शिवाय पुर्वी बहुसंख्य शेतकर्‍याला रासायनिक खते, बियाणे, पिव्हीसी पाईप, इत्यादी गोष्टीवर व्हॅट भरायला लागत नव्हता. आता मात्र या सगळ्यावर जीएसटी भरावा लागतो. तेवढ्या प्रमाणात पिकांचा हमीभाव वाढला काय? मग याचीही तुलना करून सगळाच हिशेब जनतेसमोर मांडा. प्रक्रिया उद्योगाला काय मिळाले. ५ हजार कोटीमध्ये सिंचनात काय होणार आहे? त्यात राज्यांच्या हिस्सा किती. जिल्ह्याचा किती. मग दुष्काळी भागाचे काय होणार? नवे सिंचनाचे प्रकल्प सोडा, चालू आहे ते प्रकल्प सुध्दा एवढ्या निधीमध्ये मार्गी लागू शकत नाही. ठिबक व तुषार सिंचनासाठी काय तरतूद केली. उलट पिव्हीसी पाईपला पुर्वी व्हॅट नव्हता. आता जीएसटी लावलेला आहे. मोदी सरकारच्या पेपरलेस बजेटमध्ये शेतकर्‍यांना मात्र कॅशलेस केले आहे. इंडियात राहणार्या गर्भश्रीमंत लोकांना अब्जाधीश करणारा व भारतात राहणार्या शेतकर्यांना कंगाल करणारा अर्थसंकल्प आहे.

– राजू शेट्टी

अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

सिंचनासाठी खूप कमी तरतूद

 

सिंचनासाठी फक्त ५ हजार कोटी ही फार कमी तरतूद आहे.यात आहे ते प्रकल्प सुद्धा चालू शकणार नाही.ज्या शेतीने अर्थव्यवस्था जगवली तिच्या गतिसाठी काही विशेष योजना नाही.पेट्रोल, डिझेलचे भाव गगनाला भिडलेत, खत , औषधे यांच्या किमती हाताबाहेर गेल्यात यावर नियंत्रण आणणारे या अर्थसंकल्पात काहीच नाही.म्हणून सर्वसामान्य व शेतकरी , शेतमजुरांसाठी हा अर्थसंकल्प निराशा जनक आहे.

संदीप जगताप
प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना


Tags: FarmerRaju shettisandeep jagtapswabhimani shetkari sanghatanaअर्थसंकल्प २०२१राजू शेट्टीशेतकरीसंदीप जगतापस्वाभिमानी शेतकरी संघटना
Previous Post

“अर्थसंकल्प हा निवडणुकीचा जाहीरनामा आहे, की सरकारी मालमत्ता विक्रीचे संकल्प पत्र?”

Next Post

अर्थसंकल्पाबद्दल डॉ. गिरीश जाखोटियांचं मत काय?

Next Post
गिरीश जाखोटिया

अर्थसंकल्पाबद्दल डॉ. गिरीश जाखोटियांचं मत काय?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!