मुक्तपीठ टीम
शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी परंपरागत राजकीय शत्रू असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसशी केलेली मैत्री अल्पजीवी ठरली आहे. गेले काही दिवस ते सातत्याने सत्ताधारी आघाडीवर टीका करत आहेत. त्यातही त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना थेट लक्ष्यही केले. बहुधा त्यामुळेच शेट्टी यांची विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य नियुक्ती करावी ही यापूर्वी करण्यात आलेली शिफारस महाविकास आघाडी सरकारने मागे घेतल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीकडून याविषयी अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेले नाही. राजू शेट्टी यांनी मात्र, नाराजी जाहीर केली असून राष्ट्रवादी आणि स्वाभिमानीत एक करार जाला होता. तो पाळायचा की धारदार खंजीर खुपसायचा हे राष्ट्रवादीने ठरवायचं आहे. आता मीदेखील करेक्ट कार्यक्रम करणार असा इशारा त्यांनी राष्ट्रवादीला दिला आहे.
करार पाळायचा की खंजीर खुपसायचा ते राष्ट्रवादीने ठरवावे!
- सध्या राजू शेट्टी पंचगंगा परिक्रमेवर आहेत.
- या परिक्रमेत पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा मांडत सरकारविरोधात संताप व्यक्त करतानाच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवरही हल्लाबोल केला आहे.
- त्यांनी कडक शब्दात शेट्टींनी आपल्या भावना मांडल्या आहेत.
- लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी आणि स्वाभिमानीत करार झाला होता.
- तो पाळायचा किंवा धारदार खंजीर खुपसायचा हे राष्ट्रवादीने ठरवायचं आहे.
- आम्हाला काही फरक पडत नाही. आम्ही काय त्यांच्या दारात भीक मागायला गेलो नव्हतो. त्यामुळे काही झालं तरी मला आमदार करा नाहीतर जीव सोडणार, असं मी रडणार नाही.
- गेल्या अडीच वर्षांपासून मी कोणत्याच पदावर नाही. तरीही काम करतोय.
- लोकांच्या मनातील माझे स्थान कोणी हिरावून घेऊ शकत नाही.
राजू शेट्टींची पंचगंगा परिक्रमा कशासाठी?
- राजू शेट्टी यांनी पूरग्रस्तांच्या मागण्यांसाठी बुधवारपासून पंचगंगा परिक्रमा सुरू केली आहे.
- ही परिक्रमा नरसोबाच्या वाडीत संपेल.
- त्यानंतर ५ सप्टेंबर रोजी राजू शेट्टी पूरग्रस्तांसह जलसमाधीही घेणार आहे.
- पुरामुळे सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांमध्ये मोठं नुकसान झालं आहे.
- शेतकऱ्यांची संपूर्ण शेती वाहून गेली.
- स्थानिकांची घरं पाण्यात बुडाली.
- अनेकांचे संसार मातीमोल झाले.
- सरकारकडून पूरग्रस्तांना अद्यापही मदत मिळालेली नाही.
- त्यामुळे या सर्वांना सरकारने तातडीने आर्थिक मदत द्यावी.
- तसेच २०१९च्या जीआरप्रमाणे पूरग्रस्तांना मदत देण्यात यावी.
- कुणाला वेठीस धरण्याचा आमचा हेतू नाही.