मुक्तपीठ टीम
महाविकास आघाडीच्या सरकार व कारखानदारांच्या दरोडेखोर टोळक्यांच्यात हिंमत असेल तर पुढच्या वर्षी दोन टप्यात एफआरपीचा पहिला हप्ता २२०० रूपये देऊन कारखाने चालूच करून दाखवावे, असे आव्हान शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी महाआघाडी सरकारला दिले आहे. राज्याला अधिकार नसतानाही शेतकऱ्यांचा घात करण्याचा एफआरपी दोन टप्प्यांमध्ये देण्याचं सूत्र बदलणारा निर्णय घेतला आहे. तो बेकायदेशीर आहे, असेही शेट्टींनी सरकारला बजावलं आहे.
राजू शेट्टींचा सरकारला थेट इशारा!
- ऊस दर नियंत्रण समितीच्या सूत्रामध्ये काही बदल करायचा असेल तर तो बदल संसदेलाच करावा लागेल. तो अधिकार राज्यांना देण्यात आलेला नाही.
- असं असताना राज्य सरकार एफआरपी दोन टप्प्यांमध्ये देण्याचं वेगळं परिपत्रक काढूच शकत नाही. ते पूर्णपणे बेकायदेशीर आहे. ते हायकोर्टात जावून आम्ही हाणून पाडूच.
- राज्य सरकारकडून केंद्र सरकारच्या पत्राचा हवाला देत हा शेतकरी घाताचा निर्णय घेण्यात आला आहे. ते पत्र त्यांनी पुन्हा वाचून पाहावं. साखर आयुक्तांना आकडेमोडीचा अधिकार दिलेला आहे. सूत्र बदलण्याचा नाही. हे त्यांनी लक्षात ठे
- खरंतर महाविकास आघाडीच्या रुपानं दरोडेखोरांचं एक टोळकंच या सरकारमध्ये सत्तेत आलेलं आहे. या टोळक्यानं जर ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या घरांवर दरोड टाकण्याचा कायदेशीर प्रयत्न केला तर कायदा हाती घेवून तो प्रयत्न हाणून पाडू.
- या वर्षी एफआरपी एकरकमी घेतलेली आहेच. महाविकास आघाडीच्या सरकार व कारखानदारांमध्ये हिंमत असेल तर पुढच्या वर्षी दोन टप्यात एफआरपीचा पहिला हप्ता २२०० रूपये देऊन कारखाने चालूच करून दाखवावे, रणसंग्राम जवळच आहे.
।।रणसंग्राम जवळच आहे।।
महाविकास आघाडीच्या सरकार व कारखानदारांच्या दरोडेखोर टोळक्यांच्यात हिम्मत असेल तर पुढच्या वर्षी दोन टप्यात एफ. आर. पी चा पहिला हप्ता २२०० रूपये देऊन कारखाने चालूच करून दाखवा – मा.खा.@rajushetti @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @TV9Marathi @abpmajhatv pic.twitter.com/TPfObVbd2A— स्वाभिमानी शेतकरी संघटना अधिकृत (@swabhimani7227) February 21, 2022