Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राजू शेट्टींचा आघाडीवर हल्लाबोल: “शेती कळत नाही त्यांनी मदत केली, कळते त्यांची टाळाटाळ!”

पंचगंगा परिक्रमेतून पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या आक्रोशाला वाचा फोडणार!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
raju shetti

मुक्तपीठ टीम

जुलैमध्ये झालेल्या महापुरामुळे अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं. या पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या पंचगंगा जलसमाधी परिक्रमा यात्रेला बुधवारपासून सुरुवात झाली आहे. प्रयाग चिखली या तीर्थक्षेत्री त्यांनी अभिषेक घालून त्यांनी सुरुवात केली. तब्बल पाच दिवस चालणाऱ्या त्यांच्या आक्रोश मोर्चा परिक्रमेत हजारो शेतकरी आणि स्थानिक नागरिक सहभागी आहेत. शेतकरी आणि पूरग्रस्तांच्या मागण्या मान्य न केल्यास येत्या ५ सप्टेंबर रोजी पूरग्रस्तांसह जलसमाधी घेऊ, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.

राजू शेट्टी यांचा राज्यसरकारला इशारा

• २३ ऑगस्ट रोजी राजू शेट्टी यांनी पूरग्रस्तांच्या मागण्यांसाठी मोर्चा काढला होता.
• या मोर्चामध्येच त्यांनी पंचगंगा परिक्रमेची घोषणा केली.
• पण सरकारने या मोर्चाची दखल घेतली नाही. त्यामुळे त्यांनी बुधवारपासून पंचगंगा परिक्रमा सुरू केली आहे.
• ही परिक्रमा नरसोबाच्या वाडीत संपेल.
• त्यानंतर ५ सप्टेंबर रोजी राजू शेट्टी पूरग्रस्तांसह जलसमाधीही घेणार आहे.

राजू शेट्टींच्या मागण्या

• पुरामुळे सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांमध्ये मोठं नुकसान झालं आहे.
• शेतकऱ्यांची संपूर्ण शेती वाहून गेली.
• स्थानिकांची घरं पाण्यात बुडाली.
• अनेकांचे संसार मातीमोल झाले.
• सरकारकडून पूरग्रस्तांना अद्यापही मदत मिळालेली नाही.
• त्यामुळे या सर्वांना सरकारने तातडीने आर्थिक मदत द्यावी.
• तसेच २०१९च्या जीआरप्रमाणे पूरग्रस्तांना मदत देण्यात यावी.
• कुणाला वेठीस धरण्याचा आमचा हेतू नाही.

आघाडीची पॅकेजची घोषणा, पण मिळालेच नाही!

• राजू शेट्टी यांनी आघाडी सरकारला टोला लगावला आहे.
• कृष्णा, पंचगंगा नदीतील महापुराचं पाणी बोगद्यातून दुष्काळी भागाकडे वळवण्याच्या घोषणा ही निव्वळ धूळफेक आहे.
• अशा मोठ्या योजना आणून पैसे खाण्याचा हा उद्योग आहे.
• जयंत पाटील यांची ही योजना कधीच पूर्ण होणार नाही.
• पूरग्रस्तांना पॅकेज देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.
• पण अजून कसलीही मदत मिळाली नाही.
• मदत मिळण्यासाठी मी ठाकरे यांच्याकडे गेलो होतो पण भेट दिली गेली नाही.
• अजूनही मदत मिळाली नाही.
• पूरानं शेतकरी कर्जबाजारी झाला आहे.
• शाळा, कॉलेज सुरु झाले असल्यानं फी कशी भरायची?

शेती कळत नाही त्यांनी मदत केली, कळते त्यांची टाळाटाळ!

• शेतकऱ्यांना २०१९ साली आलेल्या महापुराप्रमाणे मदत मिळायला हवी, अशी मागणीही त्यांनी केली होती.
• मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री फक्त आश्वासन देऊन गेले
• संपूर्ण पीक कर्जमाफीसह पूर पट्ट्यातील घरांचं विना अट संपूर्ण पुनर्वसन करण्याची प्रमुख मागणी खासदार राजू शेट्टी यांनी केली होती.
• मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार फक्त आश्वासनं देऊन गेले.
• ज्यांना शेती कळत नाही त्यांनी मदत केली.
• मात्र, ज्यांना ती कळते त्यांनी मदत द्यायला टाळाटाळ केली.


Tags: flood relief issueRaju shettiउपमुख्यमंत्री अजित पवारमुख्यमंत्री उद्धव ठाकरेराजू शेट्टी
Previous Post

“युपीए काळात पेट्रोल-डिझेलमध्ये एक रुपयाची दरवाढ झाली तरी तांडव करणारी भाजपा आता मूग गिळून गप्प का?”

Next Post

अफगाणी माणसांची कुणाला पडली नाही! कुत्र्यांसाठी मात्र आरोप आणि अमेरिकेचा खुलासा!

Next Post
kabul

अफगाणी माणसांची कुणाला पडली नाही! कुत्र्यांसाठी मात्र आरोप आणि अमेरिकेचा खुलासा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!