मुक्तपीठ टीम
शेतीसाठी दिवसा दहा तास वीज द्या, वीज बिलाची अन्यायी वसुली थांबवा, वाढीव बिलाची दुरुस्ती आदी मागण्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेने महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. आंदोलनात माजी खासदार राजू शेट्टी , प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील, सौरभ राजू शेट्टी, सावकर मादनाईक, राजेंद्र गड्ढयाण्णावर, राजेश पाटील, सागर शंभूशेटे, विक्रम पाटील सहभागी झाले होते. शेतकरी बांधवांनी आंदोलनात हजेरी लावून जोरदार घोषणा दिल्या. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
आंदोलनाला हिसंक वळण
- कागल येथील काही अज्ञात शेतकऱ्यांनी महावितरणचे कार्यालय पेटवून दिले.
- शाहू साखर कारखान्याच्या अग्निशामक दलाच्या गाड्यांनी तसेच जवानांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला राज्यात भडका उडतो की काय अशी शंका वर्तवण्यात येत आहे.
- तसेच दिवसा वीज देण्यास असल्याचे सांगणारे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा पुतळा जाळत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जोरदार घोषणाबाजी केली.
- बुधवारी संध्याकाळी राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत पुतळ्याला आग लावून वीज निर्मितीतील घोटाळे चव्हाट्यावर आणू असा इशारा दिला.
- ‘स्वाभिमानी’ने मंगळवारपासून ‘महावितरण’च्या ताराबाई पार्कातील मुख्यालयासमोर धरणे आंदोलन सुरु केले होते.
बुधवारी आंदोलनाचा दुसरा दिवस होता. - संध्याकाळी ऊर्जामंत्र्यांचा पुतळा पेटवून आंदोलनकर्त्यांनी असंतोष पसरवला.
- राजू शेट्टी यांनी, महावितरणच्या वीजनिर्मिती साखर कारखान्यापेक्षाही सर्वात मोठा घोटाळा असून, तो चव्हाट्यावर आणू , कंपनीमध्ये मंत्र्यांचे लागेबांधे आहेत. जनतेच्या पैशाची सरकारकडून लूट सुरू आहे, असा आरोप करत राज्य सरकार शेतकऱ्यांचे वाटोळे करत असेल तर मंत्र्यांनाही तुडवू , असा दम भरला.
आमची जमीन, आमची धरणं, आमची वीज! का डावलता? – राजू शेट्टी
- शेतीसाठी वीजेचा पुरवठा हा दिवसा झाला पाहिजे ही मागणी घेवून गेले तीन दिवस आम्ही धरणे आंदोलन करत आहोत.
- हजारोंच्या संख्येने शेतकरी येथे बसलेले आहेत.
- आणि येथे बसलेल्या शेतकऱ्यांसाठी गावागावातून जेवणासाठी भाकऱ्या येत आहेत आहेत.
- आम्ही सत्याग्रह करून शांततेच्या मार्गाने आपली मागणी समोर ठेवत आहोत.
- कारण आम्ही भूमीपुत्र आहोत आणि आम्ही हीच मागणी करत आहोत की आमच्याच जमीनीवर मोठमोठे बांध बनवलेले आहे तिथे वीजनिर्मीती होते परंतू त्या वीजेवर आमचा अधिकार नाही.
- आमची मागणी हीच आहे की दहा तास वीज द्या आणि दिवसा द्या ज्यामुळे आम्हाला शेती करण्यासाठी सुविधा प्राप्त होईल.
- परंतू इथे परिस्थिती ही आहे की आम्हाला रात्री वीज मिळते.
- रात्री मोठ्याप्रमाणात पशू रानटी प्राणी शेतात शिरतात.
- कधी वाघ आक्रमण करतो तर कधी साप चावतो यामुळे तीन-चार वर्षात कोल्हापुर जिल्ह्यात तब्बत १५-१६ शेतकऱ्यांचा
- जीव जंगली प्राण्यांमुळे झालेली आहे. आणि तब्बल अडीचशे लोकं जखमी झालेले आहेत.
- आम्ही ही माणसं आहोत.
- आमची हीच मागणी आहे आम्हाला दिवसा वीज द्या.
- देशात आम्ही अन्न पिकवतो आम्ही अन्नदाता आहोत. आम्ही माणसं आहोत हीच आमची मागणी आहे.
- परंतू सरकार आमच्या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे.
- आम्ही शांततेच्या मार्गाने सत्याग्रह करत राहू.
- सत्याग्रहात खूप मोठी ताकद असते.
- हे आम्ही दिल्लीच्या आंदोलनातून सिद्ध केलेलं आहे.
- पार्लिमेंटमध्ये तीन कृषी कायदे पारित करूनसुद्ध शेवटी ते कायदे मोदी सरकारला मागे घ्यावे लागले.
- ही सत्याग्रहाची ताकद आहे तोच सत्याग्रह इथे करून आम्ही दिवसा वीज मिळवूच.
- जो पर्यंत दिवसा वीज मिळणार नाही तोपर्यंत लढत राहू.
रात्रीच्या वीजेमुळे शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळ – सौरभ राजू शेट्टी
- गेल्या तीन दिवसांपासून सर्व भूमीपूत्र आणि तरुण याठिकाणी राजू शेट्टी साहेबांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरात बेमुदत धरणे आंदोलन देत आहे.
- या सर्वांची एकच रास्त मागणी आहे की, शेतीला रात्री वीज देण्यापेक्षा दिवसा दहा तास द्यावी आणि ती दिवसा का द्यावी?
- तर आजपर्यंत विजेचा तुटवडा होण्यामध्ये कोल्हापुर जिल्ह्यामध्ये अतिशय प्रमाण कमी आहे.
- आणि अशामध्ये सुद्धा एक चांगलं काम झाल्यामुळे आपण इतरांना बोनस देतो त्याचपद्धतीने शेतकऱ्यांना सुद्धा दिवसाची दहा तास वीज द्यावी.
- याच्यामागचं कारण हेच आहे की आजपर्यंत जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये रात्रपाळी वेळी अनेक शेतकरी किंवा युवा विद्यार्थी असूदेत किंवा युवा तरूण असूदेत रात्री पाणी पाजवायला जात असताना जंगली प्राण्यांची भीती असते, अनेकांना आपला जीव गमवावा लागलाय.
- या सगळ्या गोष्टी कमी व्हाव्यात म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेची प्रमुख्यानं मागणी आहे की, शेतकऱ्यांना दिवसा दहा तास वीज द्यावी.
- आज तिसरा दिवस अजूनपर्यंत कोणताच निर्णय किंवा कोणतीच चर्चा यशस्वी झालेली नाही आहे.
- कालच एक अज्ञात आंदोलकांनी कार्यालय जाळलं.
- उद्या अजून काय काय होईल काय सांगता येत नाही.
- जर या पद्धतीनं राजू शेट्टींना बेदखल करण्याचं सरकार काम करत असेल तर नक्कीच इथून पुढंही ही शेतकऱ्याची पोरं आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना शांत बसणार नाही.
- आज जे आंदोलन झालं इथे त्यापेक्षा उग्र आंदोलन होईल.
- पण जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही एकही उठणार नाही ही शप्पत आम्ही राजू शेट्टी साहेबांसोबत सर्व विद्यार्थ्यांनी,युवकांनी आणि आणि शेतकरी पुत्रांनी घेतलेली आहे.
गावागावातून भाकऱ्या, आंदोलनास्थळी जेवणाची सोय!
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आरटीओ कार्यालय ते अजिंक्यतारा रस्ता वाहतुकीस बंद ठेवला होता. दिवसा दहा तास वीज देता येत नसेल तर पहाटे चार ते दुपारी १२ आणि दुपारी १२ ते रात्री आठ या वेळेत वीज द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलकांना जेवणाची सोय आंदोलनस्थळी करण्यात आली होती. महावितरणच्या आवारात जेवण तयार करण्यात येत आहे
*तुळशीदास भोईटे #सरळस्पष्ट*
महाराष्ट्रात केवळ नबाव मलिक आणि ईडी याच विषयावर आंदोलनं सुरु नाहीत. वीजेच्या हक्कासाठी शेतकऱ्यांचंही आंदोलन सुरु आहे. राजकीय मसालेबाजीमुळे इतर आंदोलनं चर्चेत असतीलही, पण रात्रीच्या वीजेमुळे शेतकऱ्यांचे जे बळी जातात तेथे लक्ष वेधणारे या आंदोलनाचं फक्त मुक्तपीठसाठी कोल्हापुरातून उदयराज वडामकरांनी केलेलं गुरुवारी रात्रीचं लाइव्ह कव्हरेज:
*पाहा व्हिडीओ*